Kujira Bambolim educational complex issues Dainik Gomantak
गोवा

'कुजिरा'ची 'पार्टी स्पॉट'कडे वाटचाल, रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग; रात्री पार्ट्यांचा उपद्रव, सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय

Kujira Bambolim educational complex issues: कुजिरा (बांबोळी) येथील शैक्षणिक संकुल परिसरातील रस्ते म्हणजे पार्टीची ठिकाणे बनू लागली आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कुजिरा (बांबोळी) येथील शैक्षणिक संकुल परिसरातील रस्ते म्हणजे पार्टीची ठिकाणे बनू लागली आहेत. याशिवाय येथील स्वच्छतेकडे अजिबात लक्ष दिले जात नसून, स्टेडियमच्या बाजूने भिंतीवर लावलेली भित्तिचित्रेही निखळून पडलेली आहेत. त्याकडे संबंधितांना पाहण्यासही वेळ नसल्याचे दिसून येते.

पणजी शहरात शाळा असताना दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शैक्षणिक संकुल शहराबाहेर नेण्याचा निर्णय झाला. बांबोळी येथील कुजिरा शाळा संकुल जून २०१५ पासून कार्यान्वित झाले.

राज्य सरकारने दीर्घकालीन भाडेपट्टीवर (लिजवर) सहा शाळांना जागा वाटप केले. त्यात मुष्टिफंड संस्था, पणजी, डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल (मळा-पणजी), रोझरी हायस्कूल (मिरामार), व्ही. धेंपो उच्च माध्यमिक कला व विज्ञान विद्यालय (मिरामार), व्ही. धेंपो उच्च माध्यमिक वाणिज्य विद्यालय (मिरामार) आणि अंजुमन नुरुल इस्लाम हायस्कूल (पणजी) यांचा समावेश आहे.

या सर्व शाळांच्या समोरून आणि येथील ॲथलेटिक्स स्टेडियमच्या बाजूने सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला गेला आहे. काँक्रिट रस्ता केला गेला; पण त्याची नियतमितपणे स्वच्छता काही होत नाही. दररोज हजारो वाहने याठिकाणी मुलांना ने-आण करण्यासाठी ये-जा करीत असतात.

परंतु शाळा किंवा कॉलेज सुटल्यानंतर रात्री या संकुलाच्या समोरील रस्त्यावर पार्टी करण्यासाठी लोक येतात, असे दिसते; कारण रस्त्याच्या बाजूने बिअरच्या बाटल्या, टीन, ग्लासेस पार्टी करणारे टाकून निघून जातात, असे चित्र आहे. त्याशिवाय खाण्यासाठी आणलेल्या पत्रावळीही रस्त्यावर विस्कटलेल्या दिसत असल्याने याठिकाणाचा पार्टीसाठी वापर होतो, हे स्पष्ट होते.

उशिरापर्यंत वाहने उभी!

संकुल परिसरातील या मार्गावर प्रवेशद्वार बनवण्याचे काम करण्यात आले आहे; पण या गेटसाठी सुरक्षारक्षक नेमले गेले नाहीत, त्यामुळे हा परिसर म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असाच बनलेला आहे.

त्याशिवाय स्टेडियमच्या पूर्वेकडील बाजूनेही काँक्रिटचाच रस्ता आहे. याठिकाणी स्कूल बसेस, कदंब बसेस उभ्या केल्या जातात. याही परिसरात सायंकाळनंतर उशिरापर्यंत चारचाकी वाहने उभी राहत असल्याच्या तक्रारी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

First Sex Age: पहिला लैंगिक अनुभव ठरवणार तुमचे आरोग्य; वाढत्या वयाबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Viral Video: थोडंही संतुलन बिघडलं तर खेळ खल्लास! मृत्यूला मुठीत घेऊन काकाची लखनौच्या रस्त्यावर खतरनाक स्टंटबाजी; भन्नाट स्वॅग व्हायरल

DigiLocker Alert: डिजीलॉकर युजर्ससाठी केंद्र सरकारचा मोठा इशारा; 'या' बनावट वेबसाईटवर चुकूनही क्लिक करु नका, बँक खाते होऊ शकते रिकामे

US Green Card New Rules: "आधी अमेरिका सोडा, मगच ग्रीन कार्डसाठी अर्ज करा!", ट्रम्प सरकारचा मोठा फेरबदल; भारतीयांवर काय परिणाम होणार?

VIDEO: "तुझ्या बापाचा रस्ता आहे का?", केदारनाथच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा हाय-व्होल्टेज ड्रामा; खच्चर चालकाशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT