Book Library   Gomantak Digital Team
गोवा

Library in Goa : विविध वाचनालयात 14,870 नवी पुस्तके

ज्ञान खजिना : कृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालयामध्ये 8 हजार पुस्तकांची भर

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : दरवर्षी राज्यातील वाचनालयांत नवनवीन पुस्तकांची भर पडत आहे. यंदाही राज्यातील विविध वाचनालयांमध्ये म्हणजेच तालुका, नगर आणि जिल्हा वाचनालयांमध्ये सुमारे 14,870 पुस्तके नवीन आणली आहेत.

त्यासोबतच कृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे 8 हजार पुस्तकांची भर पडली आहे. म्हणजेच राज्यातील वाचनालयांच्या पुस्तक भांडारात नव्याने 23 हजार पुस्तकांची भर पडली आहे. वाचन साधनेसाठी हा ‘ज्ञान खजिना’ लाभदायक ठरत आहे, असेही ग्रंथपालातर्फे सांगण्यात आले.

वाचन प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहे. वाचन मानवाला बहुश्रुत बनविते. त्यामुळे शालेय अवस्थेतच वाचनाची गोडी लावणे गरजेचे असते. गोव्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर वाचनालये आहेत. ग्रामपंचायत, नगर वाचनालये, तालुका वाचनालये, जिल्हास्तरीय आणि कृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालय हे देशातील अतिशय महत्त्वाचे गणले जाणारे वाचनालयदेखील दिमाखात गोमंतकीयांची तसेच वाचनालयाला जगभरातून भेट देणाऱ्या वाचकांची, अभ्यासकांची, संशोधकांची वाचनाची भूक शमवत आहे.

वाचकांची संख्या वाढली

कोरोना महामारीनंतर वाचनालयाला भेट देणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालयात महिन्याला सुमारे 9 हजार वाचक भेट देतात. त्यापैकी 3 हजार वाचक हे घरी वाचण्यासाठी पुस्तके घेऊन जातात. फेब्रुवारी महिन्यात शाळा, महाविद्यालये, संशोधनांसाठी येणाऱ्या 35 गटांनी वाचनालयाला भेट देत वाचनालयाच्या कार्यप्रणालीची माहिती करून घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: कायदा हातात घ्याल तर याद राखा; गोवा पोलिस महासंचालकांची क्लब मालकांना तंबी

DGCA Ticket Rules Change: 48 तासांत मोफत कॅन्सलेशन, 21 दिवसांत मिळणार रिफंड... विमान प्रवासाचे 7 नियम बदलले; कधीपासून लागू होणार?

Liquor Seized: गुन्हे शाखेची मोठी कारवाई! केळीनी-उसगाव येथील गोदामातून दारूचे 500 बॉक्स जप्त; 4 जणांना घेतलं ताब्यात

Serendipity Festival 2025: सेरेंडिपिटीमध्ये कोणती नाटके पाहायला मिळणार? वाचा माहिती..

Konkani Drama Competition: मनाला स्फूर्ती देणारे 'होमखंड'; नाट्यसमीक्षा

SCROLL FOR NEXT