CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

राजभाषा कोकणीसाठी मुख्यमंत्र्यांचं एक पाऊल पुढे

गोव्यात हायकोर्टाच्या कामकाजात इंग्रजीसह कोकणीच्या वापरासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत अॅक्टिव्ह मोडमध्ये असल्याचं दिसत आहे. दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कामाचा सपाटा लावला असून मोठे निर्णय घेतले आहेत. आता राजभाषा कोकणीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. उच्च न्यायालयात कोकणीच्या वापरासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यात उच्च न्यायालयाच्या (Court) कामकाजात इंग्रजीसोबत कोकणीचा वापर व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलं आहे.‌ गोव्यातील जनतेवर चार भाषांचा प्रभाव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी (CM) स्पष्ट केलं आहे. आम्ही बोलतो कोकणी, वर्तमानपत्रं मराठीतील वाचतो, चित्रपट हिंदी बघतो आणि लिहितो इंग्रजीत असं म्हणून आता राजभाषा कोकणीला सरकारदफ्तरी न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी कामाचा धडाकाच लावला आहे. साखळी-केरी-चोर्ला घाट दरम्यान रस्त्याच्या निकृष्ट कामाचा अनुभव घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आक्रमक झाले आहे. त्यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश दिले असून या संपूर्ण कामाची त्रयस्थ तज्ज्ञांकडून तपासणी करून याचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करावा. तसेच ही चौकशी होईपर्यंत हे काम पाहणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंते आणि साहाय्यक अभियंते यांना तत्काळ निलंबित केले आहे.

याशिवाय राज्यातील 3 वर्षांतील सर्वच मोठ्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेऊन दीड महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने सरकारी कर्मचारी आणि कंत्राटदार यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

Viral Post: भारत माझ्यासाठी मंदिरासमान! माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला, पाकिस्तानी क्रिकेटरने ट्रोलर्सला पहिल्यांदाच दिलं उत्तर! पोस्ट चर्चेत

Goa Crime: फेरीबोटीतील कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; मुख्य संशयितासह दोघांना अटक

Goa Politics: "अमित शहा, या भाजपचे ढोंग पाहा", काँग्रेसचा गृहमंत्र्यांना संदेश; 'म्हजे घर' योजनेवर प्रश्नचिन्ह

'प्रमोद सावंतांमध्ये रोखण्याची हिम्मत नाही', जमिनीचा मालकी हक्क देण्याचा केजरीवालांनी 'मये'वासीयांना केला वायदा

SCROLL FOR NEXT