Sanjeet Hegde Desai Dainik Gomantak
गोवा

अमेरीकास्थित गोवेकराने कोकणीला नेले गुगलवर

अभिनंदनांचा वर्षाव : केपे येथील संजीत हेगडे देसाई यांनी दिला गुगलला प्रस्ताव

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गुगलवरील अनुवाद सेवेत कोकणी उपलब्ध होण्याचे स्वप्न अखेर साकारले आहे. मात्र त्याचे सर्वाधिक श्रेय जाते ते गुगलमध्ये वरच्या हुद्द्यावर काम करणारे केपे येथील भूमीपुत्र संजीत हेगडे देसाई यांना. त्यांनीच कोकणीचा हा प्रस्ताव गुगलच्या व्यवस्थापन मंडळासमोर ठेवला होता. जो आज प्रत्यक्षात आला. यामुळे गोव्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.(Sanjeet Hegde Desai Konkani added to Google translate)

केपे येथील प्रसिद्ध अशा हेगडे देसाई घराण्यातील संजीत हे 'भारतकार' गोविंद पुंडलीक हेगडे देसाई यांचे नातू असून ते व्यवसाया निमित्त अमेरिकेत स्थाईक झाले आहेत. 2013 मध्ये गुगलमध्ये सामील होण्यापूर्वी ते ओर्कल व एसेंच्यर मध्ये होते.

ते म्हणतात, कोकणी गुगलवर आणण्याच्या प्रत्यक्षात या कल्पनेला चालना मिळाली ती 2019 मध्ये त्यांचे मित्र चेतन आचार्य हे कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष असताना. त्यांनीच कोकणीचा हा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी हेगडे देसाई यांच्याशी संपर्क साधला असे सांगितले जाते.

स्वतः आचार्य यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की देसाई हे आपले जवळचे मित्र होते त्यामुळे आपणाला ते करणे सोपे गेले. कोकणीला सतत गौण लेखणाऱ्यांना हा चांगला धडा आहे. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष तर केलेच पण सतत आपल्या कामावर निष्ठेवर लक्ष केंद्रीत केले. कोकणीला गुगलवर स्थान मिळाल्याने अनुवादकांना , भाषा अभ्यासकांना तसेच सर्वसामान्यांना फार मोठी मदत होईल असे आचार्य म्हणाले. आता मोबाईल प्रत्येक हातात दिसू लागला आहे व त्यामुळे कोकणीही प्रत्येकाकडे पोहोचेल व तीच कोकणीची मोठी सिध्दी असेल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

स्वतः हेगडे देसाई यांनी या बाबत बोलताना सांगितले की गुगलवर अनुवादासाठी कोकणी उपलब्ध होणे हाच मुळी रोमांचक अनुभव आहे. या संदर्भात विनंती आल्यानंतर साधारण वर्षभर ही प्रक्रिया चालली होती. ही कल्पना पूर्णत्वास आणण्यात गुगलच्या साँफ्टवेअर अभियंत्यांच्या एका टीमचे मोठे योगदान आहे असे ते म्हणाले.

गुगल ट्रान्सलेटमध्ये 8 भारतीय भाषांचा समावेश

गुगल ट्रान्सलेटमध्ये आता कोंकणी भाषेचाही समावेश झाला आहे. याशिवाय 24 नव्या भाषांचा समावेश झाल्याची माहिती गुगलने दिली. यामध्ये 8 भारतीय भाषा आहेत.

आसामी, भोजपुरी, संस्कृत, डोंगरी, मैथिली, मणिपुरी आणि मिझो या भाषाही ट्रान्सलेटमध्ये असतील. मध्यभारतात जवळपास 20 लाख लोक कोंकणी भाषेचा वापर करतात. त्यामुळे गुगलने कोंकणी भाषेचा समावेश केलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT