काणकोण: महालवाडा-पैंगीण येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री बेताळ देवालयात गड्याच्या जत्रेचा एक भाग म्हणून बुधवारी रात्री दैत्यांचा जागर उत्सव झाला. दैत्याचो जागोर, चोरांचा जागर, पेन्नी जागर या वैशिष्ट्यपूर्ण जागराबरोबरच अनेक धार्मिक विधी 8 मे पासून सुरू झाले आहेत. 21 मे रोजी जत्रोत्सवाचा प्रमुख दिवस आहे.
सुमारे 45 फूट उंच दोन लाकडी खांबावर रहाट ठेवून अवसर आलेल्या खड्गधारी गड्यांना बांधण्यात येते त्यानंतर रहाट गरागरा फिरवण्यात येतो. जत्रोत्सवाचा हा चित्तथरारक प्रसंग पाहण्यासाठी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने या जत्रोत्सवाला हजेरी लावतात. कोरोनामुळे या जत्रोत्सवात खंड पडला होता.
26 ज्ञातीचा सहभाग
बेताळच्या जत्रोत्सव साजरा करण्यास सर्व 26 ज्ञातीच्या नागरिकांचा सहभाग आवश्यक असतो. पैंगीण, लोलये व खरेगाळ या तीन ग्रामातील सर्व ज्ञातीतील नागरिक या जत्रोत्सवात एकोप्याने या जत्रोत्सव विधीत सहभागी होत असल्याचे श्री परशुराम पंचग्राम देवालय समितीचे अध्यक्ष उदय प्रभू गावकर यांनी सांगितले. जत्रोत्सव काळात तीन ग्रामात लग्न, मुंज व अन्य धार्मिक कार्ये न करण्याची प्रथा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.