पणजी: मुंबईत लोहमार्गावर काही विकासकामे केली जाणार असल्याने येत्या काही दिवसांत गोव्यातून जाणाऱ्या रेल्वे नियोजित स्थानकांऐवजी अन्य स्थानकांवरच थांबवण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी ही माहिती दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगाव मुंबई जनशताब्दी शुक्रवारी (ता.२८) दादर पर्यंतच धावेल. शुक्रवारी (ता.२८) मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस दादरपर्यंतच धावणार आहे. मंगळूर मुंबई एक्सप्रेसही शुक्रवारी (ता.२८) दादरपर्यंतच धावणार आहे. मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस शनिवारी (ता.१) पनवेलपर्यंतच धावणार आहे.
शनिवारची (ता.१) मुंबई मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेलवरून प्रवास सुरु करणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस शनिवारी (ता.१) मडगावहून दादरपर्यंतच धावणार आहे. शनिवारी मडगाव मुंबई तेजस एक्स्प्रेसही दादरपर्यंतच धावणार आहे. मंगळूर ते मुंबई एक्स्प्रेस शनिवारी (ता.१) दादरपर्यंतच धावणार आहे.
शनिवारी (ता.१) मडगावहून मुंबईला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेलपर्यंत धावणार आहे. रविवारची (ता.२) मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दादरहून प्रवास सुरु करेल. रविवारी (ता.२) मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस दादरहून आणि मांडवी एक्स्प्रेस पनवेलवरून सुटेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.