Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्वे गाड्यांना रोज होतोय उशीर, 1 ते 3 तास होतोय विलंब; संतप्त प्रवाशांनी लिहिले महामंडळाला पत्र

Konkan Railway Delay: गेल्या एक महिन्यापासून कोकण रेल्वे मार्गावर मुंबई मडगाव दरम्यान धावणाऱ्या प्रमुख गाड्यांना सातत्याने होणाऱ्या प्रचंड विलंबामुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गेल्या एक महिन्यापासून कोकण रेल्वे मार्गावर मुंबई मडगाव दरम्यान धावणाऱ्या प्रमुख गाड्यांना सातत्याने होणाऱ्या प्रचंड विलंबामुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत. जनशताब्दी, तेजस आणि एलटीटी मडगाव एक्सप्रेस या गाड्या एक ते तीन तास उशिराने धावत असल्याचे प्रवाशांनी कोकण रेल्वे महामंडळाला पत्र लिहून कळवले आहे.

तेजस एक्सप्रेसला करमळीतून मडगावपर्यंत विस्तार देणे आणि एलटीटी मडगाव डबल डेकर एक्सप्रेसची पारंपरिक रेकसोबत चार दिवस एकत्रित धाव सुरू करणे, हे निर्णय कोकण मार्गाच्या क्षमता मर्यादांना पूर्णपणे विरोधी ठरले असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. सध्या कोकण रेल्वेला मुंबई मडगावच्या तीन ते चार आणि मंगळूर–मडगावच्या दोन ते तीन गाड्या एकाच वेळेच्या पट्ट्यात हाताळण्यात गंभीर अडचणी येत आहेत.

यामुळे दररोज उशिरांची साखळी निर्माण होत असून दोन्ही दिशांनी गाड्यांची वाहतूक कोलमडत आहे. मागील काही वर्षांत कोकण रेल्वेने करमळी स्थानकावर अतिरिक्त सुविधा उभारल्या. मात्र आता तेजस एक्सप्रेसला मडगावपर्यंत वाढवल्याने कर्माळीमध्ये विकसित केलेली सुविधा वापरात नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.

सध्या फक्त आठवड्यातून एकदाच धावणारी एलटीटी करमळी एसी सुपरफास्ट ही गाडीच करमळीचा वापर करते. या गाड्या उशिराने धावत असल्याने मुंबईत जाणाऱ्या लोकल पकडणे अनेकांना कठीण होऊ लागले आहे. मुंबई उपनगरी वाहतुकीचा शेवटचा/पहिला लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना धावाधाव करावी लागत असून, स्त्रिया, मुले, ज्येष्ठ नागरिक मोठ्या गैरसोयीचा सामना करत आहेत. अनेकांनी त्यांचे कनेक्टिंग लोकल वा पुढील प्रवास चुकवल्याची उदाहरणेही दिली आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही या अनिश्चित वेळांमुळे रात्रीभर काम करावे लागत असल्याचे नमूद केले आहे.

८ तासांचा उशीरही नवा नाही

तेजस एक्सप्रेस ४ ते ८ तास उशिरा

जनशताब्दी १ ते ३ तास उशिरा

एलटीटी मडगाव एक्सप्रेस १ ते २ तास उशिरा

उपाययोजनांची मागणी

पत्रात मंत्रालयाला खालील तातडीच्या उपायांची शिफारस केली आहे.

१. तेजस एक्सप्रेस मडगावऐवजी पुन्हा कर्माळीपर्यंतच चालवावी.

२. एलटीटी मडगाव एक्सप्रेस थिवी किंवा सावंतवाडीपर्यंत मर्यादित करावी.

३. मुंबई–मडगावच्या सर्व गाड्या सिंगल-लाइन कोकण मार्गावर एकामागोमाग न धाववणे.

या वारंवार होणाऱ्या उशिरांमुळे प्रवाशांचे सुरक्षित, सन्मानजनक आणि नियोजित प्रवासाचे हक्क हिरावले जात आहेत. अल्पकालीन उपायांसोबतच संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण तातडीने पूर्ण करण्याचीही गरज आहे.
अक्षय महापदी, रेल्वे प्रवासी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025: वाहतूक कोंडी करून, सर्वसामान्यांना त्रास देऊन 'इफ्फी'चे उदघाटन का केले?

Sholay Bike At IFFI: ..ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! इफ्फीमध्ये 'शोले'मधील बाईकचा जलवा; फोटो खेचण्यासाठी होत आहे तुफान गर्दी

17 वर्षांनंतर हरवलेला मुलगा आई-वडिलांच्या मिठीत, कुटुंबात आनंदाचं वातावरण; जाणून घ्या संपूर्ण कहाणी

Suryakumar Yadav Captain: 'मिस्टर 360' च्या हाती कमान! सूर्यकुमार यादव करणार मुंबई संघाचे नेतृत्व

NEET PG Goa: गोव्यात पहिला, तर भारतात 212 वा क्रमांक! आंजनेयने उंचावली ‘गोमेकॉ’ची प्रतिष्ठा; नीट-पीजी परीक्षेत दैदिप्यमान यश

SCROLL FOR NEXT