Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात पळून येण्याचा प्लॅन फसला! मंगळूरमधील हत्याप्रकरणातील मुख्य संशयित मडगावात जेरबंद, पोलिसांचे मोठे यश

Madgaon Railway Station: शेजारच्या कर्नाटक राज्यातील मंगळूर येथून खून करून रेल्वेतून गोव्यात पळून आलेल्या खुन्याला कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव रेल्वे स्थानकावर जेरबंद केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: शेजारच्या कर्नाटक राज्यातील मंगळूर येथून खून करून रेल्वेतून गोव्यात पळून आलेल्या खुन्याला कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव रेल्वे स्थानकावर जेरबंद केले. प्रशांतकुमार भंडारी (वय ३६) असे या संशयिताचे नाव असून तो मूळ बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील आहे.

संशयित सापडल्याची माहिती मंगळूर पोलिसांना दिली असून ते गोव्यात आल्यानंतर प्रशांतला त्यांच्या ताब्यात दिले जाईल, अशी माहिती कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली.

मंगळूर येथील पनामपूर पोलिस ठाण्यात संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

या पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल बुधवारी (ता. १०) वाजता एकाचा खून झाला होता. प्रशांत याने हा खून केल्याचा संशय आहे. खुनाच्या घटनेनंतर तो फरार झाला होता. हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेतून तो पळाला असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवार पोलिसांनी याबाबत कोकण रेल्वे पोलिसांना सतर्क केले होते.

त्यानंतर कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हिरू कवळेकर व पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी तत्काळ एक विशेष पथक तयार केले. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र गावडे, पोलिस शिपाई वसीम शेख, मंजुनाथ दोडमणी आणि संजय गावकर यांचा समावेश होता.

या पथकाने मडगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे प्रशांत याला काल मडगाव रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात आणले. नंतर पनामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहम्मद सलीम यांना याबद्दल माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT