Crime News: आधी मजेत फिरवलं, मग पुलावरुन खाली फेकलं! डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या 'नीट' विद्यार्थिनीचा भीषण शेवट; प्रियकरानं काढला काटा

Odisha Crime News: ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली. येथे एका तरुणाने आपल्याच प्रेयसीची निर्घृण हत्या केली.
Odisha Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Odisha Crime News: ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली. येथे एका तरुणाने आपल्याच प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर हा प्रकार म्हणजे एक रस्ते अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या. राकेश आचार्य असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो दिगपहंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमाखंडी पॅंथ भागातील रहिवासी आहे.

राकेश आणि मृत तरुणी अंबिका यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, काळाच्या ओघात त्यांच्या नात्यात दुरावा आणि तणाव निर्माण होऊ लागला होता.

Odisha Crime News
Cyber Crime: 'तुम्ही गुगलवर अश्लील व्हिडिओ पाहता'; सायबर चोरांचे फिल्मी स्टाईल ब्लॅकमेलिंग, महिलेला घातला लाखोंचा गंडा, तिघे अटकेत

अंबिका ही राकेशकडे सतत लग्नासाठी तगादा लावत होती. मात्र, राकेशला लग्नाची कोणतीही जबाबदारी नको होती. या सततच्या त्रासाला आणि दबावाला कंटाळून त्याने आपल्या प्रेयसीला कायमचे वाटेतून हटवण्याचा एक क्रूर कट रचला. पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी राकेशने अंबिकाला आपल्या दुचाकीवर फिरवण्याच्या बहाण्याने गोपाळपूर येथे नेले. दोघेही दिवसभर एकत्र फिरले आणि रात्रीच्या वेळी परत येत होते.

आरोपानुसार, परतत असताना अंकुली ओव्हरब्रिजजवळ संधी साधून राकेशने चालत्या दुचाकीवरुन अंबिकाला जोरदार धक्का दिला. ओव्हरब्रिजवरुन थेट खाली कोसळल्यामुळे गंभीर दुखापत होऊन अंबिकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Odisha Crime News
Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात वादळ आणि पावसाचे 100 बळी, जनजीवन विस्कळीत; बाधितांना आर्थिक मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

या भीषण कृत्यानंतर राकेशने अत्यंत चलाखीने या हत्येला अपघाताचे रुप देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरुन कोणालाही त्याच्यावर संशय येणार नाही. विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर राकेशने स्वतः अंबिकाच्या कुटुंबीयांना फोन करुन तिच्या मृत्यूची माहिती दिली. हा एक भीषण रस्ता अपघात होता, असा विश्वास त्याने कुटुंबीयांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु, राकेशच्या बोलण्यात अनेक विसंगती होत्या. त्याचे जबाब आणि घटनास्थळाची परिस्थिती यांचा मेळ लागत नसल्याने अंबिकाच्या कुटुंबीयांना त्याच्यावर संशय आला. हा केवळ अपघात (Accident) नसून यामागे मोठा कट असल्याचा संशय आल्याने, अंबिकाचे काका काह्नू जेना यांनी बैद्यनाथपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.

Odisha Crime News
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

तक्रार मिळताच पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला. पोलिसांनी अंबिकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि तांत्रिक पुरावे गोळा केले. तपासादरम्यान पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडले, ज्यावरुन हा साधा अपघात नसून एक पूर्वनियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले. राकेशविरुद्ध ठोस पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला अटक करुन स्थानिक न्यायालयात हजर केले.

Odisha Crime News
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच केली लिंगबदल शस्त्रक्रिया, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

मृत अंबिका गंजम जिल्ह्यातील रोही गावाची रहिवासी असून ती अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली होती आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच 'नीट'च्या तयारीसाठी ती ब्रह्मपूर येथे राहत होती. आपली मुलगी डॉक्टर बनेल, अशी आशा तिच्या पालकांना होती; मात्र ज्या तरुणावर तिने जीवापाड प्रेम केले, त्यानेच तिचा घात केला. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com