Lokmanya Tilak Terminus Madgaon Weekend Special Train 2024 Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: सलग सुट्टीत गोव्याचा प्लॅन करा; कोकण रेल्वे सोडणार स्पेशन ट्रेन, जाणून घ्या Timetable

Konkan Railway: सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या वतीने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Pramod Yadav

Konkan Railway 15 August Long Weekend Special Train 2024

पणजी: कोकण रेल्वेच्या वतीने या आठवड्यात मुंबई ते मडगाव विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिन आणि त्यानंतर येणाऱ्या विकेंड यामुळे वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. १५ आणि १७ ऑगस्ट असे दोन दिवस ही विशेष गाडी सोडली जाणार आहे.

कोकण रेल्वेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सलग सुट्या असल्याने कोकण मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकण रेल्वेच्या वतीने ०११४९ / ०११५० लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष गाडी सोडली जाणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव विशेष रेल्वे Lokmanya Tilak Terminus- Madgaon Junction Special Train

ट्रेन क्रमांक ०११४९ लोकमान्य टिळक (टी) ते मडगाव जंक्शन १५ आणि १७ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता मुंबईतून सुटतील आणि सकाळी दहा वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

Mumbai- Madgaon Train Number

ट्रेन क्रमांक ०११५० मडगाव ते लोकमान्य टिळक (टी) १६ आणि १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मडगाव स्थानकावरुन सुटेल आणि रात्री १२.४० वाजता मुंबईत पोहोचेल.

कोणकोणत्या ठिकाणी थांबणार ट्रेन Lokmanya Tilak Terminus Madgaon Special Train Hault

२१ डब्यांची ही विशेष ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी स्थानकावर थांबेल.

मुंबई - मडगाव विशेष ट्रेनबाबत अधिक माहितीसाठी enquiry.indianrail. gov.in ला भेट या संकेतस्थळाला भेट देता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT