काणकोण: गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर सायबर अटॅकचे बळी ठरले आहेत. तवडकरांचा फेक आयडी आणि Whatsapp वर डिपीला फोटो वापरून फसवणूक केली जात आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील चाळीस आमदारांना फोन करुन पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार सभापती तवडकरांनी दाखल केलीय.
सभापती रमेश तवडकरांनी याबाबत काणकोण पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे. माझा बनावट फेक आयडी तयार करुन तसेच, Whatsapp वरती डिपीला फोटो वापरुन बदनामी केली जात आहे. राज्यातील सर्व आमदारांना फोन करुन पैशांची मागणी केली जात आहे, असे तवडकरांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, मी कोणत्याही प्रकारे कोणत्याच आमदाराकडे पैसे मागितले नाहीत अथवा मला तशी गरज देखील नाही, असे तवडकरांनी स्पष्ट केले आहे.
सभापती रमेश तवडकरांनी याबाबत पोलिसांनी तात्काळ लक्ष घालून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.