Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्वे प्रशासनाचा अ‍ॅक्शन मोड! कुजलेली फळे विकणाऱ्यांवर कडक कारवाई

Train Food Safety: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ३१ मेपासून कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाने आणि रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्तपणे १५ दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेच्या प्रारंभीच जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये एका अनधिकृत विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली.

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी मडगाव ते मुंबई सीएसएमटी यादरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक १२०५२ जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये एक विक्रेता कुजलेली फळे विकताना आढळून आला. विशेष म्‍हणजे त्‍याच्‍याकडे वैध ओळखपत्र, विक्री परवाना नव्‍हता.

विशेष मोहीम

कोकण रेल्वेने सुरू केलेली ही विशेष मोहीम संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर राबवली जात आहे. अनधिकृत विक्री रोखणे, प्रवाशांची आर्थिक फसवणूक थांबवणे तसेच खाद्यपदार्थांचा दर्जा आणि स्वच्छता सुनिश्चित करणे, यावर या मोहिमेत विशेष भर दिला जात आहे.

प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.प्रवासादरम्यान अशा प्रकारचे अनधिकृत विक्रेते किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास त्यांनी तत्काळ रेल्वे प्रशासन अथवा रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार नोंदवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT