Arrest Canva
गोवा

Margao Crime: खबऱ्याने गुप्त माहिती दिली अन् 4 तासांत कोकण पोलिसांनी चोरट्याला अटक केली; सोन्याची चैन हिसकावून झाला होता फरार

Konkan Railway Police: मडगाव रेल्वे स्थानकावरुन महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून फरार झालेल्या चोरट्याला कोकण पोलिसांनी चार तासांत अटक केली.

Pramod Yadav

मडगाव: रेल्वे स्थानकावरुन महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावून फरार झालेल्या चोरट्याला कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे अवघ्या चार तासांत पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ०४ सप्टेंबर रोजी ही कारवाई केली.

अशोक हरी घरत (५०, रा. पनवेल शहर, रायगड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी फिलोमिना रॉड्रिग्ज (५९, रा. वास्को, दक्षिण गोवा) यांनी मडगाव रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगाव रेल्वे स्थानकावर फिलोमिना थांबल्या असता संशयित अशोक त्यांच्या गळ्यातून १.६० लाख किंमतीची सोन्याची चैन हिसकावून फरार झाला. ३१ ऑगस्ट सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. फिलोमिना यांनी याप्रकरणी ०४ सप्टेंबर रोजी मडगाव येथील कोकण रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला. रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेची सर्वात पहिल्यांदा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तक्रारदार महिलेच्या मदतीने सीसीटीव्हीतील व्यक्तीची खातरजमा करण्यात आली. चोरट्याचे फोटो आणि वर्णन सर्व पोलिस स्थानक आणि गुप्तपणे कार्यरत असणाऱ्या खबऱ्यांना पाठविण्यात आले.

दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा व्यक्ती मडगावमधील ज्वेलरी शॉपच्या अवतीभोवती फिरत असल्याची माहिती खबऱ्याने कोकण रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी धाव घेत चोरट्याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT