Goa GMC
GMC GoaDainik Gomantak

GMC Goa: नातेवाईकांना मिळते अपमानास्पद वागणूक, कर्मचाऱ्यांच्या ढिसाळपणा; गोमेकॉत वाढल्या तक्रारी

GMC Complaints Goa: गोमेकॉ सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये (एसएसबी) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
Published on

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये (एसएसबी) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रुग्णांच्या मते, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळपणामुळे आधीच त्रस्त असलेले रुग्ण आणखी मनःस्तापाला सामोरे जात आहेत.

रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी बोलावूनही दोन-तीन तासांनी पुन्हा येण्यास सांगितले जाते, तर काही वेळा सकाळी बोलावून संध्याकाळी तपासणीसाठी वेळ देण्यात येतो. याशिवाय तीन-चार आठवड्यांपूर्वी अपॉइंटमेंट दिली जाते.

मात्र दिलेला वेळ नेहमीच पाळला जात नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचा वेळ, पैसा आणि मानसिक स्थैर्य याचा मोठा अपव्यय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Goa GMC
Goa GMC: 'गोमेकॉ'मध्ये आणताना 88 रुग्‍ण दगावले! विधानसभेत आरोग्‍यमंत्र्यांच्या उत्तरातून माहिती समोर

दरम्यान, रुग्णांच्या मते, गोमेकॉसारख्या राज्यातील प्रमुख वैद्यकीय संस्थेत अशा प्रकारे ढिसाळपणा होत असल्याने सामान्य रुग्णांचा विश्वास डळमळीत होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि रुग्णांसाठी सुसंगत व वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Goa GMC
Goa GMC: खरंच हे गोव्यात घडलं? गोमेकॉतील घटनेने गोव्याचं नाव जगभर चर्चेत!

कर्मचाऱ्यांवर थेट नियंत्रण हवे

रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अलीकडेच गोमेकॉवरील लक्ष कमी केल्याने अशी परिस्थिती उद्भवली आहे. परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांवर थेट नियंत्रण व देखरेख राहणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय रुग्णालयातील शिस्त आणि सेवा सुधारण्याची अपेक्षा ठेवता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com