Colvale Crime Dainik Gomantak
गोवा

Colvale Crime: विलासी आयुष्याचे आमिष दाखवून दोन मुलींचे अपहरण

दोघांना अटक : अल्पवयीन मुलींची हुबळीमधून सुटका; सोन्याचे दागिने विकले सोनाराला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime कोलवाळ येथील दोन अल्पवयीन मुलींना विलासी आयुष्य जगण्याचे आमिष दाखवून त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणण्यास प्रवृत्त करून अपहरण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दोन युवकांना हुबळीमधून अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी तौसिफ किल्लेदार उर्फ मुन्ना (20, धारवाड) आणि नावेद अहमद पानीबंद (18, हुबळी-धारवाड) या दोघांना अटक केली.

कोलवाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीतून 12 आणि 15 वर्षीय मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवार, 29 मे रोजी घडली. याप्रकरणी दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अपहरणाचे दोन गुन्हे दाखल केले होते.

तपासादरम्यान संशयित हुबळीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हुबळी गाठत संशयितांचा शोध घेतला. कोलवाळ पोलिसांनी कसबा पेठ पोलिसांच्या मदतीने अपहृत मुलींची संशयितांच्या तावडीतून सुटका केली. तसेच मुलींना घरात डांबून ठेवल्याप्रकरणी संशयितांना अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी भादंसं कलम ३६३ व गोवा बाल कायदा ८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक मंदार परब यांनी या शोधमोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावली.

48 तासांत तपास

कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणाचा 48 तासांत शोध लावला. दोन्ही मुली सुखरूप असून त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. यात पीडितांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संशयितांवर भादंसं तसेच ‘पॉस्को’अंतर्गत अतिरिक्त कलमे जोडली जातील.

- जीवबा दळवी, उपअधीक्षक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "वेळ आणि जागा ठरवा आम्ही येतो",आप-काँग्रेस भिडले; पालेकर-पाटकरांचा Face-Off लवकरच?

Belgaum-Goa Highway: डोक्यावर, चेहऱ्यावर जखमा! तिरणेघाट पुलाखाली अंगणवाडी सेविकेचा आढळला मृतदेह; बेळगाव-गोवा महामार्गावरील घटनेने खळबळ

Bhagat Singh: फाशीचा हुकूम आला, जेलर कोठडीकडे गेला; 'भगतसिंग' तेंव्हा लेनिनचे पुस्तक वाचत होते..

"हे देवा बायगिणकारा!" युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ नकोच; कदंब पठारावरील ग्रामस्थांचे गाऱ्हाणे

Gaur: वाघालासुद्धा हताश करून पळवून लावणारा, गोव्याचा राज्यप्राणी 'गवा'

SCROLL FOR NEXT