Dessert Dainik Gomantak
गोवा

पारंपारिक पद्धतीने महेश मांद्रेकर तयार करतात खाजे मिठाई!

महेश माद्रेकर हे मागच्या तीस वर्षेपासुन आजही पारंपारिक पद्धतीने बनवतात दर्जेदार खाजे.

दैनिक गोमन्तक

मोरजी : मांद्रे देऊळवाडा येथील महेश माद्रेकर (Mahesh Madrekar) हे मागची तीस वर्षे आजही पारंपारिक पद्धतीने दर्जेदार खाजे, मिठाई, भक्कम पेढा, काप, फेणोरी, लाडू रेवढे, चुरमा आणि इतर पदार्थ बनवण्याचे काम करत आहेत.

मिठाईचे (Dessert) दुकान ते आजही पूर्वजांचे चालवत आहे, स्थानिक कामगारांना घेवून केवळ पारंपारिक पद्धतीने ते मिठाई बनवण्याचे काम करत असतात. त्यांच्या दुकानातील उत्कृस्ठ पद्धतीचे पोहे उपराष्ट्रती शंकर दयाल शर्मा याना स्व. मंत्री देऊ मांद्रेकर यांनी पोचवले होते. आणि त्याचा आस्वाद घेताना महामई यांनी आपला अभिप्राय मांद्रेकर कुटुंबियाना पोचवला होता.

महेश मांद्रेकर यांनी बोलताना आपले बाबा महादेव याना गावात बोमी म्हणून लोक ओळखत होते, आणि बोमिचे खाजे व मिठाईचे सर्व पदार्थ खूप चवीस्ट आणी प्रसिद्ध होते. आजोबा पासून हे दुकान सुरु आहे ते वडील आणि नंतर आपण हे चालावतो. भाऊ भालचंद्र, द्वारकानाथ आणि अनंत मांद्रेकर यांच्या सहकार्यातून ह्या व्यवसाय वजा कला आम्ही आजपर्यंत चालूच ठेवलेली आहे.

देऊ मांद्रेकर हे उपसभापती असताना त्यांनी आमच्या दुकानातील पोहे उपराष्ट्रती शंकर दयाल शर्मा याना पोचवले होते. आपल्या कलेची दखल त्या ठिकाणी घेतली गेली हा आनंद आपल्याला आजही वाटतो. राज्यभर लाडू खाजे उपलब्ध आहेत परंतु आमच्या दुकानात पारंपारिक पद्धतीने आजही मैसूर पाक, काजू बर्फी, खाजे, फेणोरी ,भक्कम पेढा असे स्वता घराकडे करतो.

कोरोना काळात व्यवसायावर बराच परिणाम झाला आहे, त्याचा फटका आम्हालाही आणि आमच्या कामगाराना बसला, ज्याचे पोट हातावर असते त्याना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, त्या काळात सरकारने आम्हाला काहीच मदत केली नाही, परंतु आता सरकारने अश्या लहान व्यावसायीकाना ५००० पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे, हा व्यवसाय नसून ती एक कला आहे, आणि हि कला कुणाला शिकायची असेल तर आपण मोफत प्रशिक्षण द्यायला तयार असल्याचे महेश मांद्रेकर यांनी सांगितले.

जत्रेनिमित्ताने हे पदार्थ बनवण्यासाठी किमान १० कामगार कामाला असतात कोरोना काळात तो व्यवसाय थंडावला होता, आता पुन्हा एकदा या कलेला प्रोत्साहन मिळेल असा आशावाद महेश मांद्रेकर यांनी व्यक्त केला.

या व्यवसायात कोणी यायला तयार नाही, महिला मंडळाने हि कला शिकून आपलाही व्यवसाय करावा, हि पारंपारिक कला केवळ मांद्रे गावात आणि तेही आपल्याकडे असल्याचे सांगून कोणी शिकायला तयार असेल तर त्यांनी यावे असे आवाहन केले. आपण सर्व पदार्थ स्वता करतो असे सांगून पेडणे तालुक्यातील प्रमुख जत्रेला उत्सवाना आपण दुकान घालत असल्याचे सांगितले. याकडे व्यवसाय म्हणून न पाहता ती एक कला म्हणून आपण पाहतो असे मांद्रेकर म्हणतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT