कला-संस्‍कृती खात्याच्या पुरस्‍कारांमध्‍ये वशीलेबाजी!

योग्‍य कलाकारांना डावलल्‍याचा आरोप : निवड समितीबाबत प्रश्‍‍नचिन्‍ह.
Arts and culture
Arts and cultureDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍य शासनाच्या कला आणि सांस्कृतिक (Arts and culture) संचालनालयातर्फे अभिजात संगीत, नाटक, भजन, तियात्र, कीर्तन, चित्रकला, लोककला, हस्तकला, साहित्य अशा क्षेत्रांत भरीव योगदान दिलेल्या ज्येष्ठ आणि लौकिक पात्र कलाकारांना दिले जाणारे पुरस्कार (Awards) जाहीर झाले आहेत. संगीत, साहित्य, भजन, कीर्तन अशा काही क्षेत्रांतील ज्या व्यक्तींची या पुरस्कारांसाठी निवड आहे ती त्या पुरस्कारांसाठी योग्य असलेल्या कलाकारांना डावलून वशिल्याने केली गेल्याची तीव्र प्रतिक्रिया साहित्य, कला क्षेत्रात उमटली आहे.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार हे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जातात, तेव्हा त्या पुरस्कारांसाठी त्या योग्यतेचे कलाकार निवडले जावेत अशी अपेक्षा असते. परंतु, त्या खात्याच्या मंत्र्यांनी व पर्यायाने सरकारने मुळात निवड समितीवर त्या त्या क्षेत्रातील बुजुर्ग नेमले नव्हते, ही अन्यायकारक बाब पुढे आली आहे. संगीत, भजन, साहित्य, चित्रकला, हस्तकला अशा क्षेत्रांतील कुणीच नेमण्यात आले नव्हते. यावरून आपल्या मर्जीतील लोकांची समितीवर नेमणूक करण्यात केली होती, असा आक्षेप घ्यायला जागा राहते. त्यामुळे या निवडीत पारदर्शकता नव्हती, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.

Arts and culture
‘जनमन उत्सवा’ला वास्कोत प्रतिसाद!

हा तर कलाकारांवर अन्‍याय

संगीतातील पुरस्कारासाठी ज्या कलाकाराच्या नावाची शिफारस पद्मश्री प्रसाद सावकार यांनी केली होती त्यांचे नाव संपूर्ण गोव्यात व गोव्याबाहेरही माहिती असतानाही त्यांना डावलून एकप्रकारे कडीच केली आहे. भजन क्षेत्रातील पुरस्कार ज्या कलाकाराला जाहीर झाला आहे त्याची संबंधित मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने निवड नक्की झाल्याचे खुद्द या खात्यात बोलले जात होते आणि त्याप्रमाणे घडलेही. त्यामुळे खऱ्या अर्थाने योगदान असलेल्या भजनी कलाकारांवर अन्याय झाला आहे अशी भजन क्षेत्रातील कलाकारांची भावना झाली आहे. कीर्तनाबाबत झालेली निवडही आक्षेपार्ह असल्याचे एका मान्यवर कीर्तनकाराने नाव उघड न करण्‍याच्‍या अटीवर ‘गोमन्‍तक’ला (Gomantak) सांगितले.

त्‍यांचे नावही ऐकले नाही

साहित्य क्षेत्रात ज्यांना गोव्याबाहेरील कविवर्य बा. भ. बोरकर पुरस्कार व इतर अनेक संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत आणि जे साहित्यिक म्हणून अनेक वर्षे प्रस्थापित आहेत त्यांना डावलले आहे. संगीत क्षेत्रातील ज्या व्यक्तीला पुरस्कार जाहीर झाला आहे त्या व्यक्तीचे योगदान तर नाहीच पण त्या व्यक्तीचे नाव सुद्धा ऐकलेले नाही, अशी प्रतिक्रिया संगीताचा या आधीचा राज्य पुरस्कार प्राप्त झालेले गायक धर्मानंद गोलतकर यांनी व्यक्त केली आहे.

गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्यामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीचा अध्यक्ष या नात्याने माझ्या सोबत अन्य पाच सदस्य आणि सदस्यसचिव यांच्यासमोर आलेल्या समस्त अर्जांची छाननी करून आलेल्या शिफारशी आदींचा, तसेच त्या व्यक्तींचे कला सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान, त्याचप्रमाणे वयाचा निकष प्रामुख्याने लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी एकमताने निवड केलेली आहे. यंदा या पुरस्कारासाठी अर्ज केलेले बहुतांश कलाकार या पुरस्काराच्या प्रतिष्ठेला साजेल असेच होते. त्यामुळे अंतिम पुरस्कार विजेत्यांसंदर्भात निर्णय घेताना त्यांच्या योगदानाबरोबरच वयाचाही प्रामुख्याने विचार करण्याची जबाबदारी समितीवर होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com