Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गतिरोधक ठरला जीवघेणा! स्कूटरवरील नियंत्रण सुटल्याने दुर्दैवी अपघात; केरळच्या 26 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Prajwal Karmalkar Scooter Accident: व्हिजन हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात प्रज्वल करमळकर या 26 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

Manish Jadhav

म्हापसा: गोव्यात रस्ते अपघातांची मालिका सुरुच असून धुळेर येथून एक धक्कादायक घटना समोर आली. व्हिजन हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर स्कूटरवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात प्रज्वल करमळकर या 26 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. प्रज्वल हा मूळचा केरळचा रहिवासी असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल आपली स्कूटर घेऊन धुळेर मार्गावरुन जात असताना व्हिजन हॉस्पिटलच्या समोरील गतिरोधक ओलांडताना हा अपघात झाला. गतिरोधकावर स्कूटरचा वेग जास्त असल्याने किंवा अचानक ब्रेक लावल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो जोराने रस्त्यावर आपटला. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की प्रज्वलच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली आणि 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले.

स्थानिक लोक आणि रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्थीने त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात (Hospital) पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला 'ब्रॉट डेड' घोषित केले. दुसरीकडे, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि प्रज्वलचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला.

रस्त्यावरील गतिरोधक आणि वाहन चालकांचा अतिवेग हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याचे या घटनेवरुन पुन्हा एकदा अधोरेखित झाले. प्रज्वलच्या अकाली निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघातावेळी त्याने हेल्मेट घातले होते की नाही, याचाही शोध घेतला जात आहे. गोव्यातील अंतर्गत रस्त्यांवर वाहन चालवताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT