

दक्षिण गोव्यातील नाकेरी-बेतुल मार्गावर एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. बाली येथून नाकेरीच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. रोहित सावंत देसाई (वय २३) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हा बाली येथून नाकेरीकडे आपल्या दुचाकीवरून जात होता. नाकेरी-बेतुल येथील रस्त्यावर हा अपघात इतका भीषण होता की, रोहितचा जागीच प्राण गेला. त्याच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांवर आभाळ फाटले आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, स्थानिकांनी रस्त्यावरील भटक्या गुरांकडे बोट दाखवले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर भटक्या गुरांचा वावर असतो, ज्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक दाबावा लागतो किंवा नियंत्रण सुटते. या अपघातामागेही रस्त्यावर अचानक आलेले एखादे जनावर कारणीभूत असावे, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक (PI) डायगो ग्रासियस आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी तपासत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.