Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: भुयारी मार्गासह रेल्वे फाटकही उघडे ठेवा

‘फाटक बंद’झाल्यास स्थानिकांची गैरसोय- युरी

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao चांदर येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग फाटक उद्यापासून बंद केले जाणार आहे. त्यामुळे भुयारी मार्ग व पूलही खुला करण्यात आला आहे. तरीही भुयारी मार्ग व पुलासह रेल्वे फाटकही खुले ठेवावे,अशी मागणी विरोधी पक्ष नेते कॉंग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

रेल्वे फाटक बंद केल्याने लोकांची गैरसोय होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. रेल्वेफाटक बंद करण्याच्या निर्णयामुळे शाळकरी मुले, चर्चला जाणारे भाविक, बाजाराला भेट देणारे गिर्दोळीचे रहिवाशी यांची गैरसोय होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

चांदर चर्च व गिर्दोळी जंक्शनला जोडणारे रेल्वे फाटक उद्या सोमवार १ मे पासुन कायमचे बंद करण्याचा निर्णय दक्षिण पश्र्चिम रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने यापुर्वीच भुयारी रस्ता एका वर्षांपुर्वी तयार केला आहे. शिवाय चांदर रस्त्यावरील पूलही वाहतुकीस खुला करण्यात आला आहे,असे रेल्वेतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अशा प्रकारे बंद होणारे हे तिसरे रेल्वे फाटक आहे. भूमी गट रस्ता व पूल रेल विकास निगमतर्फे बांधण्यात आले आहे. भूमिगत मार्गाचे उदघाटन सप्टेंबर 2022 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व पुलाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते करण्यात आले होते.

रेल्वेने भूयारी रस्ता बांधण्यासाठी 50 लाख व पूल बांधण्यास अंदाजे दोन कोटी रुपये खर्च केल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोंबा येथील रेल्वे फाटकासंदर्भातही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असे कळते. हल्लीच मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी या भागात उड्डाण पूल बांधण्याचे संकेत दिले होते व रेल्वेने मान्यता दिल्याचेही स्पष्ट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT