Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Karnataka Stolen Gold Case: कर्नाटकातील चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या प्रकरणाचे धागेदोरे आता गोव्यातील म्हापशापर्यंत पोहोचले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

बार्देश: कर्नाटकातील चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या प्रकरणाचे धागेदोरे आता गोव्यातील म्हापशापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी संशयिताला सोबत घेऊन म्हापशातील एका सराफा दुकानात भेट देत चौकशी केली. संशयिताने चोरीचे सोन्याचे दागिने याच दुकानात विकल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

पोलिस पथक संबंधित दुकानात पोहोचले असता दुकानमालक उपस्थित नसल्याने सविस्तर चौकशी होऊ शकली नाही. त्यानंतर पोलिसांनी दुकानातील कर्मचाऱ्यांकडून प्राथमिक माहिती घेतली. तसेच व्यवहाराशी संबंधित नोंदी, खरेदी-विक्रीची कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची माहितीही मागविण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी कर्नाटक पोलिसांनी संबंधित सराफा दुकानाच्या मालकाला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. संशयिताने विकलेले दागिने चोरीचे असल्याची माहिती सराफाला होती का? व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाला होता का? आणि सोन्याची खरेदी करताना आवश्यक ओळखपत्र व नोंदी घेण्यात आल्या होत्या का? याची कसून चौकशी केली जाणार आहे.

चोरीच्या मालाचा माग काढण्यासाठी कर्नाटक पोलिस विविध राज्यांमध्ये तपास करत असून गोव्यातील हा व्यवहार तपासातील महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका आहे का? हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणत्याही सराफाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आमच्याकडे तक्रार नाही ः म्हापसा पोलिस

यासंदर्भात म्हापसा पोलिस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, चोरीचे दागिने कर्नाटकातील एका चोरट्याने म्हापशातील एका सोनाराला विकल्या प्रकरणी कर्नाटकातील पोलिस म्हापशातील एका सराफाच्या दुकानात तपासणी करून गेले, पण त्याबाबत आमच्याकडे त्यांची तक्रार नसल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT