Porvorim: घरातच दबा धरुन बसला होता 'तो' राक्षस! अल्पवयीन मुलीच्या जबाबावर कोर्टानं ठेवला विश्वास; नराधम बापाला मोठा झटका

Porvorim POCSO Case: स्वतःच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील ‘फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टा’ने ३८ वर्षीय वडिलांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे.
Porvorim POCSO Case
PorvorimDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: स्वतःच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील ‘फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टा’ने ३८ वर्षीय वडिलांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. टेक बहादूर कामी उर्फ राजू विश्वकर्मा असे आरोपीचे नाव आहे.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्वरी येथील आरोपीच्या राहत्या घरी ही घटना घडली होती. सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तसेच तिला किस केले, असे आरोप आहेत.

Porvorim POCSO Case
Cyber Crime: विवाह डेकोरेशनसाठी कर्ज घेणे पडले महागात, युवतीला लाखांचा गंडा; मायणा-कुडतरी पोलिस हद्दीतील घटना

या प्रकरणी बचाव पक्षाने अल्पवयीन पीडितेच्या जबाबात विसंगती असल्याचा दावा करत आरोपीला दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने पीडितेचे जबाब एकमेकांना पूरक असल्याचे निरीक्षण नोंदवले. पीडितेच्या दृष्टिकोनातून पाहता, हा अत्याचार करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ६२ आणि ११५ अंतर्गत तसेच ‘पॉक्सो’ कायद्याच्या कलम ८ आणि १८ अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa POCSO Case
Supreme Court POCSO Case Goa
POCSO Case Goa
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com