Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Candolim Beach Drowning: गोव्यातील कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर बुडाल्याच्या संशयामुळे बेपत्ता झालेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर सिकेरी येथील एका रिसॉर्ट परिसरात आढळून आला.
Candolim Beach Drowning
Candolim Beach Drowning IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर बुडाल्याच्या संशयामुळे बेपत्ता झालेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर सिकेरी येथील एका रिसॉर्ट परिसरात आढळून आला.

शोधमोहीमेनंतर लागला शोध

मृत युवकाची ओळख उत्तराखंडमधील रहिवासी शाहिद आफ्रिदी (वय 25) अशी झाली आहे. तो कांदोळी समुद्रात उतरला असताना बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

त्यानंतर तो बेपत्ता झाल्याने तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. किनारपट्टीवर तसेच समुद्रात विविध यंत्रणांच्या मदतीने शोध घेतल्यानंतर अखेर सिकेरी येथील एका रिसॉर्टजवळ त्याचा मृतदेह सापडला.

Candolim Beach Drowning
Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

पोलीस आणि संबंधित यंत्रणांचा तपास सुरू

मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Candolim Beach Drowning
Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

समुद्रकिनाऱ्यांवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटक आणि स्थानिकांना समुद्रात उतरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. समुद्रातील भरती-ओहोटी, तीव्र लाटा आणि धोकादायक प्रवाह यांचा अंदाज घेऊनच पाण्यात उतरण्याचा तसेच लाइफगार्डच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Salman Khan Goa project news
Crime News
Bengaluru Crime News
Salman Khan High Court Notice Candolim Villa Construction
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com