कारगिल विजय दिवस Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 26 रोजी कारगिल विजय दिवसाचे आयोजन

आर्वी स्पोर्टस अँड कल्चरल क्लब,कोरगाव या संस्थेच्या वतीने 'कारगिल विजय दिवसाचे'आयोजन करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: आर्वी स्पोर्टस अँड कल्चरल क्लब,कोरगाव या संस्थेच्या वतीने 'कारगिल विजय दिवसाचे' दिनांक 26 जुलै 2021 रोजी सायं.5 वाजता शिवाजी चौक, देऊळवाडा कोरगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. (Kargil Victory Day on 26th July by Arvi Sports and Cultural Club Goa)

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर, खास निमंत्रित गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तसेच मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, कोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा साळगावकर व इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कोरगाव गावात तसेच पेडणे तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येईल.

तसेच कोविड महामारीच्या काळात कोरगाव गावात योगदान दिलेल्या डॉक्टरांचा 'कोविड योद्धा' म्हणून गौरव करण्यात येईल. यात डॉ. नवनाथ केरकर, डॉ.पंढरी कोरगावकर, डॉ. पुंडलिक गवंडी यांचा गौरव करण्यात येईल. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने भारतीय नौदलात सेवा बजावलेले अनिल बोंद्रे, वीस वर्षे भारतीय सेनेत सेवा बजावलेले कोरेगावचे सुपुत्र रुपेश भाईडकर यांचा यावेळी खास सत्कार करण्यात येईल. हा कार्यक्रम कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आर्वी स्पोर्टस अँड कल्चरल क्लबचे अध्यक्ष विराज हरमलकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT