MRF Shed

 

Dainik gomantak

गोवा

'एमआरएफ' शेडला कारापूरवासियांचा विरोध; उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

या जागेत अद्याप सुसज्ज क्रीडामैदान उभारण्यात आलेले नाही. त्यातच पंचायतीतर्फे आता या मैदानाच्या जागेतच एमआरएफ शेड उभारण्याच्या हालचाली सुरु आहेत

दैनिक गोमन्तक

डिचोली : डिचोली तालुक्यातील कारापूर येथील नियोजित क्रीडामैदानाच्या जागेत होऊ घातलेल्या 'एमआरएफ' (मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी) शेडला स्थानिकांचा विशेष करून युवकांचा विरोध वाढत आहे. क्रीडामैदानाच्या जागेत 'एमआरएफ' शेड नकोच. अशी मागणी करणारे एक निवेदन कारापूरच्या युवकांनी बुधवारी (ता.22) डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांना दिले आहे. आम्हाला त्वरित क्रीडामैदान उपलब्ध करून द्या. अशी मागणीही या युवकांनी केली आहे.

कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील कारापूर येथील ज्ञानज्योती हायस्कुल समोरील जवळपास 12 हजार चौरस मीटर जागा (सर्व्हे नं-22/2) क्रीडामैदानासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या जागेत अद्याप सुसज्ज क्रीडामैदान उभारण्यात आलेले नाही. त्यातच पंचायतीतर्फे आता या मैदानाच्या जागेतच एमआरएफ शेड उभारण्याच्या हालचाली सुरु आहेत. या शेडला स्थानिक युवकांचा तीव्र विरोध आहे.

गेल्या महिन्यात 21 तारखेला झालेल्या पंचायतीच्या (Panchayat) ग्रामसभेतही या विषयावर चर्चा झाल्यानंतर मैदानाच्या जागेत एमआरएफ शेड नको. अशी मागणी करून तसा ठराव घेण्यात आला आहे. शेडसाठी मैदानाची जागा सोडून अन्य पर्यायी जागेचा विचार करावा. क्रीडामैदान खेळण्यासाठी त्वरित उपलब्ध करून द्यावे. अशी मागणीही ग्रामसभेत करण्यात आली होती. मात्र अद्याप त्यादृष्टीने कोणतीच पावले उचलण्यात आली नसल्याने बुधवारी युवकांच्या एका गटाने डिचोलीच्या (Bicholim) उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सुनील पोकळे आणि समीर वायंगणकर यांच्या नेतृत्वाखाली युवकांच्या गटाने उपजिल्हाधिकारी वायंगणकर यांना आपल्या मागणीचे निवेदन देऊन मैदानाच्या जागेत 'एमआरएफ' शेडला विरोध करण्यामागील कारणे स्पष्ट केली. यावेळी 25 हून अधिक युवक उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी वायंगणकर यांनी युवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गट विकास अधिकारी कार्यालयामार्फत या विषयी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT