Madkai Firing Dainik Gomantak
गोवा

Madkai Firing: गूढ वाढले! मडकईत गाडीवर गोळीबार; भाजप नेता थोडक्यात बचावला

Madkai Crime News: भारतीय जनता पक्षाचा युवा नेता तथा व्यावसायिक सौरभ सुदेश लोटलीकर यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला होता, पण सुदैवाने सौरभ लोटलीकर थोडक्यात बचावले.

Sameer Panditrao

फोंडा: करंजाळ-मडकई येथे गुरुवारी संध्याकाळी अज्ञाताकडून कारगाडीवर गोळीबार झाल्यामुळे हा परिसर हादरला असून हल्लेखोरांच्या शोधात पोलिस आहेत. भारतीय जनता पक्षाचा युवा नेता तथा व्यावसायिक सौरभ सुदेश लोटलीकर यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला होता, पण सुदैवाने सौरभ लोटलीकर थोडक्यात बचावले. मात्र अजून या गोळीबाराचे गूढ उलगडले नसल्याने उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मडकई मतदारसंघातील करंजाळ येथे गुरुवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान हे गोळीबाराचे प्रकरण घडले आहे. सौरभ लोटलीकर हे जी०९ डी ९७९७ या क्रमांकाच्या इनोव्हा कारगाडीने घराकडून मडकईच्या दिशेने जाताना वाटेत कारगाडी थांबवून सौरभ लोटलीकर खाली उतरल्यावर लगेच गोळी झाडण्यात आली.

मात्र सौरभ हे गाडीतून खाली उतरल्यामुळे गोळी कारच्या दरवाजाला लागल्याने थोडक्यात बचावले, पण कारगाडीच्या पुढच्या दरवाजाला छेद पडला असून काचही फुटली आहे. त्यामुळे गाडीचे दहा हजार रुपये नुकसान झाले आहे.

हा हल्ला झाल्यानंतर सावरलेल्या सौरभ लोटलीकर यांनी त्वरित म्हार्दोळ पोलिस स्थानक गाठून तक्रार नोंदवली. त्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला वेग दिला. पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर तसेच म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत, फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी कसून तपास सुरू केला आहे, मात्र अजून धागेदोरे सापडलेले नाहीत. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा हे काल रात्री म्हार्दोळ पोलिस स्थानकात दाखल झाले आणि त्यांनी तपासाचा आढावा घेतला.

दुचाकीने आले हल्लेखोर

सौरभ लोटलीकर यांच्यावर गोळी झाडलेले हल्लेखोर हे दुचाकीने आले होते, मात्र ते दोघेजण होते, की एकटा होता यासंबंधी माहिती मिळू शकली नाही. हा हल्ला एवढ्या गतीने झाला की सौरभ लोटलीकर यांना हल्लेखोरांना ओळखणे कठीण झाले.

पूर्ववैमनस्य की व्यावसायिक कारण...?

हा हल्ला करण्यामागे अजून कारण स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांनी गोळी झाडून पलायन केले. गोळी कुठे लागली हे त्यांनी पाहिलेले नाही.

मात्र हा हल्ला पूर्ववैमनस्यातून की व्यावसायिक कारण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. म्हार्दोळ पोलिस याप्रकरणी कसून तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NH 66 Road Closure Goa: पणजीला जायचं कसं? ओ कोकेरो जंक्शन ते मॉल दे गोवा रस्ता 'पाच महिने बंद'

Bandora: उंच पठारांवर पडणारा पाऊस, झऱ्यांचे रूपाने सखल भागांकडे धाव घेतो; बांदोडा गावची जैवविविधता

Pearl Fernandes: भूतानमध्ये गोमंतकीय 'पर्ल'चा डंका! सॅफ करंडकमध्ये भारताने नमवले बांगलादेशला

Goa News Live Update: आप अध्यक्ष अमित पालेकर यांनी रस्त्यांची स्थिती दाखवण्यासाठी केले सायकल राईडचे आयोजन

Velge: 'दाही दिशी बाप्पा मोरया'! नारळाच्या झाडापासून श्री गणरायाची प्रतिकृती; ‘कल्पवृक्ष कलाधिपती'

SCROLL FOR NEXT