Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कार आडवी घातली, आरसा तोडला! म्हापशात कारचालकाचा गोंधळ; रोडरेज प्रकरणी गुन्हा दाखल

Mapusa Crime: कामरखाजन, म्हापसा येथे रोड-रेजवरून कार आडवी घालून महामार्ग अडवून आणि तक्रारदारांच्या कारचा आरसा तोडण्याचा प्रकार घडला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : कामरखाजन, म्हापसा येथे रोड-रेजवरून कार आडवी घालून महामार्ग अडवून आणि तक्रारदारांच्या कारचा आरसा तोडण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संबंधित संशयित कार चालकाविरुध्द गुन्हा नोंद केला.

ही घटना रविवारी (ता.११) रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी निवेजय हळदणकर (पोंबुर्फा) यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. फिर्यादी घटनेच्यावेळी बस्तोडाहून कोलवाळच्या दिशेने आपल्या जीए ०३ एएफ ७०५३ क्रमांकाच्या कारने राष्ट्रीय महामार्गावरून जात होता.

तर त्याच दिशेने भरधाव संशयित आरोपी हा जीए ०६ ई ८९५६ क्रमांकाच्या लाल रंगाच्या ‘इनोव्हा’ने जात होता. संशयित आरोपीने बेदरकारपणे आपले वाहन चालवल्यामुळे मानवी जिवाला धोका निर्माण झाला.

यावेळी फिर्यादींनी संशयिताला चालत्या कारमधूनच जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संशयिताने घटनास्थळी जाऊन फिर्यादींच्या गाडीसमोर कार आडवी घालून त्यांना अडवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT