Goa Crime: बनावट गिऱ्हाईक बनून पोलीस पोहोचले अन्... गोव्यात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची केली सुटका; दलालांचे धाबे दणाणले

Goa Crime News: मानवी तस्करी विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला रिवण येथील क्राईम ब्रँचने जुने गोवे येथे एक मोठी कारवाई करत मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला.
busts human trafficking racket
busts human trafficking racketDainik Gomantak
Published on
Updated on

जुने गोवे: मानवी तस्करी विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला रिवण येथील क्राईम ब्रँचने जुने गोवे येथे एक मोठी कारवाई करत मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या गुप्त मोहिमेत पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून एका संघटित गुन्हेगारी जाळ्यावर टाच आणली. या धडक कारवाईमुळे राज्यात अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बनावट गिऱ्हाईकामार्फत लावला सापळा

क्राईम ब्रँचला एका अज्ञात एजंटकडून महिलांचा लैंगिक शोषणासाठी वापर केला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. एका पोलीस कर्मचाऱ्याला 'बनावट गिऱ्हाईक' (Decoy Customer) म्हणून पाठवण्यात आले. एजंटने देहविक्रीसाठी महिलांची सोय करण्याचे मान्य करताच, दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची (Women) सुटका केली.

busts human trafficking racket
Goa Crime: मुंगुल गँग वॉरचा आरोपी आता 'पोक्सो'च्या कचाट्यात! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी कुख्यात अमर कुलालच्या आवळल्या मुसक्या

बचाव आणि कायदेशीर कारवाई

दरम्यान, या कारवाईनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (ITPA) च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिलांना तातडीने संरक्षण गृहात हलवण्यात आले असून तिथे त्यांना आवश्यक काळजी आणि समुपदेशन (Counselling) दिले जात आहे. त्याचवेळी, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि इतर एजंटांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

busts human trafficking racket
Goa Crime: गोव्याच्या व्यावसायिकाला 'मिरची' झोंबली! दुबईत निर्यातीच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक, पुण्यातील एकावर गुन्हा दाखल

मानवी तस्करी विरोधात कडक पाऊल

योगायोगाने ही कारवाई 'मानवी तस्करी विरोधी दिना'च्या मुहूर्तावर झाल्याने पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. गोव्यातील (Goa) अशा प्रकारच्या अनैतिक व्यापाराचे मूळ शोधून काढण्यासाठी आणि यामागील संघटित गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी क्राईम ब्रँच विशेष मोहीम राबवत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Human Rights Commission Smart Meter
rent a car driver attack case
Goa Crime
Rising crime against women in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com