Kala Academy in Panjim  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कला अकादमीप्रश्नी थोडी उपरती; कलाकारांची समिती स्थापणार

Charles Correa Foundation: मुख्यमंत्र्यांनी कुरैय्या फाउंडेशनची मदत घेण्याचे तसेच कलाकारांची समिती स्थापन करण्याचे सूतोवाच केले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरण कामाच्या निकृष्ट दर्जावरून आज पुन्हा विरोधकांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरल्यानंतर सरकारला अखेर थोडी उपरती झाली व यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कुरैय्या फाउंडेशनची मदत घेण्याचे तसेच कलाकारांची समिती स्थापन करण्याचे सूतोवाच केले.

कला अकादमीच्या कामाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार कार्लुस फेरेरा व आमदार विजय सरदेसाई यांनी आज विधानसभेत करून कला अकादमीच्या नूतनीकरण कामाच्या निकृष्ट दर्जाचा प्रश्न मांडला होता.

कला अकादमीच्या नूतनीकरणात ज्या काही त्रुटी आहेत, त्यात बदल करण्याची सरकारची तयारी आहे. चार्ल्स कुरैय्या फाउंडेशन व कलाकारांकडून येणाऱ्या सूचनांचा विचार केला जाईल, तसेच कलाकारांचीही वेगळी समिती स्थापन केली जाईल. बांधकामासंदर्भात त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल पुढील अधिवेशनावेळी सभागृहासमोर ठेवला जाईल, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज प्रश्‍नोत्तर तासावेळी दिले.

कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामानंतर निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे राहिलेल्या त्रुटींची यादी तसेच त्या दुरुस्त करण्यासाठी केलेली कृती याची माहिती द्या. या कामाचे लेखा परीक्षण केले आहे का व संगीताचे वर्ग कला अकादमीमध्ये स्थलांतर केले आहेत का? नसल्यास त्या वर्गांच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे का? व नसल्यास कारणे देण्याची मागणी आमदार कार्लुस आल्मेदा व आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामासंदर्भात आयआयटी मुंबईने तपासणी करून संरचनात्मक स्थिरतेचे प्रमाणपत्र दिले आहे. या बांधकामाची दायित्व मुदत ३ वर्षे व दुरुस्ती मुदत ५ वर्षांची असून त्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. कला अकादमीच्या मुख्य सभागृहात यापूर्वी पुढील पहिल्या सहा रांगांमध्ये पावसाळ्यात पाणी साचायचे. त्यामुळे कार्यक्रम होत नव्हते. मात्र, आता या नूतनीकरणानंतर यापुढे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत पावसाचे पाणी येणार नाही व कार्यक्रम करणे शक्य होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कला अकादमी नूतनीकरणाचे सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशी टीका आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली. मुख्य सभागृहातच पाणी गळत असल्याने हे काम कमी दर्जाचे झाल्याचे उघड होते. यावर्षी कला अकादमीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने ही वास्तू सुपूर्द केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, कला व संस्कृतीमंत्री मंत्री तसे झालेले नाही असे उत्तर देतात यात विसंगती का असा प्रश्न कार्लुस फेरेरा यांनी मांडला.

सभागृहातील खुर्च्यांचे रंग, कार्पेट तसेच ध्वनी यंत्रणा बदलण्यात आली आहे. या नूतनीकरणाच्या नावाखाली सुमारे ७५ कोटींची लूट झाली आहे. सभागृहातील हा बदल करण्याचा निर्णय कोणी घेतला असा प्रश्‍न आमदार विजय सरदेसाई यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सभागृह समिती नेमावी अशी मागणी त्यांनी केली.

कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली. या निकृष्ट दर्जाच्या कामाचे सरकार लेखा परीक्षण करून सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार धरणार का? असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

कंत्राटदाराला ४२ कोटी रुपये अदा

कला अकादमीच्या नूतनीकरणावर ४९ कोटी ५८ लाख रुपये खर्च आला असून त्यापैकी आत्तापर्यंत कंत्राटदाराला ४२ कोटी रुपये बांधकाम, वीज तसेच प्लंबिग व ध्वनी यंत्रणेच्या कामासाठी देण्यात आले आहेत. सभागृहावरील फॉल सिलिंग पडलेले नसून खुल्या छप्परावरून पाणी घुसल्याने ही घटना घडली आहे. या कामांमधील त्रुटी दूर करण्यासाठी अनुभवी कलाकारांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनने केलेल्या सूचनांचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

PF Withdrawal New Rule: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफ खात्यातून ॲडव्हान्स काढण्याचे बदलले नियम; आता किती वेळा काढता येणार पैसे?

SCROLL FOR NEXT