गोमन्तक डिजिटल टीम
गोवन लोकांचे कलेवरील प्रेम सर्वश्रुत आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा वैभवशाली आहे. कला अकादमी स्थानिक कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
कला अकादमीचे नूतनीकरण झाल्यानंतर त्यात अनेक त्रुटी जाणवत आहेत. सदोष ध्वनीयंत्रणा, परिसरातील कचरा, गळती इ. अनेक मुद्द्यांवरून हे नूतनीकरण वादग्रस्त ठरले आहे.
कला अकादमीच्या खुल्या नाट्यगृहाचे छत कोसळून एक वर्ष पूर्ण झालेले आहे. या प्रकरणामुळे आणि एकूणच नूतनीकरणातील हेळसांड पाहून कलाकार आणि प्रेक्षक संतप्त झाले आहेत.
द क्राय या अभिनव संकल्पनेतून कलाकारांनी कला अकादमीला श्रद्धांजली वाहिली. सांस्कृतिक क्षेत्रात होणार्या सरकारी गैरकारभारामुळे कलाकारांची होत असलेली घुसमट व्यक्त करण्यासाठी हे कलात्मक ‘रुदन’ सादर झाले.
नाटक, संगीत, चित्रकला, तियात्र, कविता ही सारी माध्यमे या कलाकारांनी आपल्या अभिव्यक्तीसाठी सशक्तपणे वापरली. कला अकादमीशी भावनिक नाते जुळवून असलेल्या कलारसिकांनीही उत्स्फूर्तपणे गर्दी करून दाद दिली
‘गोवा बियॉन्ड बीचेस’; पावसाळ्यात 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या!