Goa Kala Academy ceiling collapse Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कसे कोसळले 'कला अकादमी'चे छत? ‘टास्क फोर्स’ची होणार बैठक; हैद्राबादच्या अहवालाकडे विशेष लक्ष

Kala Academy Ceiling: कला अकादमीच्या खुल्या सभागृहाचे छत कोसळण्याच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक ८ जानेवारी रोजी होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कला अकादमीच्या खुल्या सभागृहाचे छत कोसळण्याच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक ८ जानेवारी रोजी होणार आहे.

ही बैठक ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या बैठकीत छत कोसळण्यामागील कारणे, तसेच पुढील कार्यवाही याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. कला अकादमीच्या खुल्या सभागृहाच्या फेरबांधकामापूर्वी हैद्राबाद येथील प्रयोगशाळेकडून येणाऱ्या तांत्रिक अहवालाकडे टास्क फोर्सचे विशेष लक्ष लागून राहिले होते.

या अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याने तो अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा अहवाल आता सरकारकडे प्राप्त झाला असून ८ जानेवारीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जबाबदारी ठरवणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश असणार आहे.

इमारतीच्या सुरक्षिततेबाबत चिंता

दरम्यान, कला अकादमीच्या इमारतींच्या सुरक्षिततेबाबत कलाकार, रसिक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या शिफारशी आणि बैठकीतील निर्णयांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

छत कोसळण्याच्या घटनेनंतर कला अकादमीच्या पायाभूत सुविधांच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित झाले असून, या बैठकीत फेरबांधकामाचा आराखडा, कालमर्यादा आणि खर्च यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. कला अकादमीसारख्या सांस्कृतिक केंद्राची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी सरकार कोणते ठोस निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT