Pramod Sawant, Mauvin Godinho X
गोवा

Kadamba Smart Card: गोव्यात आता 'स्मार्ट' प्रवास! कदंबाच्या कार्डचे अनावरण; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत

KTCL Transit Smart Card: कदंब बसमधून प्रवास करणाऱ्यांना आता तिकिटासाठी पैसे बाळगण्याची गरज नाही. कदंब वाहतूक महामंडळाच्या स्मार्ट कार्डचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Bus Smart Transit Card Inauguration

पणजी: कदंब बसमधून प्रवास करणाऱ्यांना आता तिकिटासाठी पैसे बाळगण्याची गरज नाही. कदंब वाहतूक महामंडळाच्या स्मार्ट कार्डचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात केले.

हे कार्ड कोणत्याही बसस्थानकावर उपलब्ध असलेला अर्ज भरून देऊन १५० रुपयांत मिळते. त्यात ‘यूपीआय’च्या मदतीने पैसे जमा करता येतात. सुरवातीला घेतले जाणारे १५० रुपयेही कार्डमध्येच जमा असतील म्हणजे ते कार्ड मोफतच मिळणार आहे. विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात निम्मी सवलतही याच कार्डाच्या मदतीने मिळवता येणार आहे. याशिवाय इतर प्रवाशांना या कार्डच्या वापराच्या बदल्यात तिकिटात १० टक्के सवलत मिळणार आहे. लवकरच ही सुविधा कदंबच्या आंतरराज्य बससेवेसाठीही उपलब्ध केली जाणार आहे. ‘म्हजी बस’ योजनेतील बसमध्येही हे स्मार्ट कार्ड चालेल.

यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंबचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, पुंडलिक खोर्जुवेकर, प्रवीण वळवटकर, प्रवीमल अभिषेक, कदंबचे उपाध्यक्ष कृतेश गावकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थी, विशेष विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नागरिक आदी विविध घटकांतील प्रत्येकी एका प्रवाशाला स्मार्ट कार्डे प्रदान केली.

‘डिजिटल’ सेवा

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, कदंब समाजिक सेवा देते, त्यामुळे इतर महामंडळांप्रमाणे कदंबला नफ्या-तोट्याची फूटपट्टी लावता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे त्याला अनुसरून कदंबची ही सेवा आहे.

एका कुटुंबात चारजण असतील तर ते एकच कार्ड वापरू शकतील. वाहकाकडे कामावर रुजू होताना किती पैसे होते, तिकीट विक्रीनंतर किती पैसे आहेत, विनातिकीट प्रवासी आहेत का, याच्या तपासणीसाठी लागणारे मनुष्यबळ आता कमी लागणार आहे. यापुढे बसमध्ये वाहकांचीही गरज नसेल; पण सध्याच्या वाहकांना कमी केले जाणार नाही.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

SCROLL FOR NEXT