Porvorim: दहा दिवसांत डांबरीकरण, माहिती फलक उभारणी; 'पर्वरी' प्रकरणात कंत्राटदाराची न्‍यायालयात हमी

Porvorim Flyover: पर्वरीतील उड्डाण पूल काम सुरू असलेल्या ठिकाणी काही रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेले दिव्याचे खांब तेथून हटवण्यास वीज खात्याला सांगण्यात आले आहे.
Porvorim Flyover
Porvorim FlyoverDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Flyover Construction

पणजी: पर्वरीतील उड्डाण पुलाच्या कामावेळी होणारे धूळ प्रदूषण व वाहतूक समस्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पर्यायी रस्त्यांचे डांबरीकरण येत्या १० दिवसांत पूर्ण केले जाईल. सार्वजनिक बांधकाम खाते व वाहतूक पोलिसांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय नव्याने काम सुरू केले जाणार नाही.

आवश्‍यक असलेल्या ठिकाणी माहिती फलक उभारण्यात येतील, अशी हमी आज कंत्राटदारातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात देण्यात आली. गोवा खंडपीठाने त्याची आदेशात नोंद करून पुढील सुनावणी जानेवारी २०२५ मध्ये न्यायालयीन सुट्टीनंतर ठेवली.

सांगोल्डा जंक्शन ते ओ कोकेरोपर्यंत सध्या या उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. तेथील बाजूने असलेल्या रस्त्यांचे काही प्रमाणात डांबरीकरण झाले आहे, तर काही ठिकाणी झालेले नाही, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. हे डांबरीकरण दहा दिवसात सुरू केले जाईल, अशी हमी कंत्राटदाराने दिली. ज्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने चर खोदण्यात आले होते, ते बुजवण्यात येऊन त्याचे सपाटीकरण सुरू आहे. लवकरच डांबरीकरण केले जाणार आहे.

Porvorim Flyover
Amit Naik: सुलेमान खानला मदत करणाऱ्या अमित नाईकला कोर्टाचा दणका; न्यायालयीन कोठडीत रवानगी

पांगम यांची माहिती

जिल्हाधिकाऱ्यांनी या माहिती फलक लावण्यासाठीचा आदेश जारी केला आहे व सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याची माहिती कंत्राटदाराला दिली आहे. पणजी व म्हापसाच्या दिशेने प्रत्येकी एक रुग्णवाहिका मोटारसायकल चोवीस उपलब्ध असेल. याशिवाय पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एक १०८ रुग्णवाहिका आहे त्याचाही वापर केला जाईल. वाहतुकीसाठी अडथळा येत असलेली बांधकाम भिंत पाडण्यात आली आहे तसेच खासगी जागेत असलेला एक गाडाही लवकरच हटवण्यात येईल असे पांगम यांनी खंडपीठाला माहिती दिली.

Porvorim Flyover
Suleman Khan Escape: मुलाला एकदा तरी भेटू द्या! अमितच्या हतबल आईची पोलिसांना विनवणी; रडून रडून सुजले डोळे

आवश्‍यक तेथे दिवे लावण्‍याचे निर्देश

पर्वरीतील उड्डाण पूल काम सुरू असलेल्या ठिकाणी काही रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेले दिव्याचे खांब तेथून हटवण्यास वीज खात्याला सांगण्यात आले आहे तसेच दिवाबत्ती ज्या ठिकाणी लागत नाही तेथे दिवे लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

या रस्त्यावर कंत्राटदाराला किमान ३० वाहतूक मदतनीस (ट्राफिक मार्शल) सेवेसाठी उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच पोलिसांना ४८ तास अगोदर माहिती दिली जाईल.

असे निर्णय झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आले आहेत त्याची माहिती कंत्राटदाराला देण्यात आली आहे.

या कामासंदर्भातच्या समस्येबाबत घेण्यात येणाऱ्या संयुक्त बैठकीवेळी कंत्राटदाराचा प्रतिनिधी उपस्‍थित असण्याकडे खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले. खंडपीठाने कंत्राटदाराचा प्रतिनिधी उपस्थित कामाची माहिती देणे आवश्‍यक आहे असे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com