Kadamba Interstate bus Dainik Gomantak
गोवा

Pernem News : पुन्हा एकदा कदंबा रुतली; पेडण्यातील तोरसे येथील घटना

खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Interstate bus : राज्यात मान्सूनला सुरवात झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही काही ठिकाणी सुरु आहे. मार्गाचे काम सुरु असल्याने काही ठिकाणी भले मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. मुसळधार पाऊस पडल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. तसेच महामार्गावर काम सुरु असलेल्या काही ठिकाणी सूचना फलक लावले नसल्याचे वाहनचालकांनी सांगितले.

मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याने काही ठिकाणी अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. पेडणेतील तोरसे येथे कदंबा इंटरस्टेट बस रुतल्याची माहिती समोर येत आहे. यात बसचे नुकसान झाले आहे.

कदंबा इंटरस्टेट बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने येत होती. मुंबई-गोवा महामार्गावर तोरसे येथे बसचा टायर चिखलात रुतला. चालकाने प्रयत्न केले असता बस बाहेर आली नाही.

Kadamba Interstate bus

दरम्यान, कदंबा खड्ड्यात रुतल्याचा अशीच एक घटना दक्षिण गोव्यातील जांबावली याठिकाणी घडली होती. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या कदंबाचे चाक रस्त्यावरील चिखलमय खड्ड्यात रुतले.

बस खड्ड्यातून पुढे बाहेरच येत नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसला धक्का देण्याची वेळ आली. 'श्री रामनाथ दामोदर महाराज की जय' जयघोष करत विद्यार्थ्यी चिखलात रुतलेली बस ढकलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT