Zambaulim : राज्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचे काम कदंब वाहतूक महामंडळ करीत आहे. पण याच विद्यार्थांवर कदंबची बस ढकलण्याची वेळ आली. हा प्रकार शनिवारी दक्षिण गोव्यातील जांबावली याठिकाणी घडलेला आहे.. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
श्री रामनाथ दामोदर महाराज की जय' जयघोष करत विद्यार्थ्यी चिखलात रुतलेली बस ढकलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. जांबावलीतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचे काम कदंब बसमार्फत करण्यात येते.
शाळेच्या समोर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असून खोदकाम करुन माती टाकण्यात आलेली आहे व रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. शनिवारी मुलांना नेण्यासाठी आलेल्या कदंब बस अडकून बसली. बसचे चाक रस्त्यावरील चिखलमय खड्ड्यात रुतले.
बस खड्ड्यातून पुढे बाहेरच येत नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसला धक्का देण्याची वेळ आली. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अशी होते वाहतूक
महामंडळाकडे डिझेलवर चालविण्यात येणाऱ्या 500 बसेस आहेत. त्यातील दररोज म्हणजे आठवड्यातील सहा दिवस 200 बसेस सकाळी ते दुपारी शाळा सुटेपर्यंत व्यस्त असतात.
शाळांच्या मुलांना ने-आण करण्याबरोबर मधल्या काळात सरकारी कर्मचारी पोहोचविण्याचे कामही या बसेसना पार पाडावे लागते. दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर या बसेस पुन्हा प्रवाशी सेवेत रुजू होतात, असा सर्व खेळ महामंडळाला पार पाडावा लागतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.