Kali Tiger Reserve Dainik Gomantak
गोवा

Kali Tiger Reserve: रविवारी मिळाली टीप, मध्यरात्री पडली धाड! काळी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची शिकार; 'कदंब'चा कर्मचारी वन खात्याच्या जाळ्यात

Kali Tiger Reserve Hunting Case: कर्नाटकातील काळी व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील जोयडा तालुक्यातील बोंडेली गावाजवळ उघडकीस आलेल्या वन्यजीव शिकारप्रकरणी कदंब वाहतूक महामंडळातील एका कर्मचाऱ्याला वन खात्याने अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: कर्नाटकातील काळी व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील जोयडा तालुक्यातील बोंडेली गावाजवळ उघडकीस आलेल्या वन्यजीव शिकारप्रकरणी कदंब वाहतूक महामंडळातील एका कर्मचाऱ्याला वन खात्याने अटक केली आहे. या प्रकरणात गोव्यातील आणखी तिघेजण तसेच शिकारीस मदत केल्याचा आरोप असलेली एक स्थानिक व्यक्ती बेपत्ता असून त्या सर्वांचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या संशयिताची ओळख जयेंद्र दिगंबर गावडे (वय ४५ वर्षे)

असून तो कदंब वाहतूक महामंडळात यांत्रिक कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी बोंडेली गावाजवळ शिकारीची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने तातडीने कारवाई केली. त्यानंतर मध्यरात्री कुंभारवाडा विभागाच्या वन कर्मचाऱ्यांनी सुभाष मिराशी यांच्या निवासस्थानी छापा टाकला. शिकारीसाठी वापरलेल्या बंदुकीचा संबंध मिराशी यांच्याशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मात्र, मिराशी सध्या बेपत्ता असून इतर तीन संशयितांसह त्यांचा शोध घेतला जात आहे.

कारवाईदरम्यान वन अधिकाऱ्यांनी गोळी झाडून ठार केलेल्या ‘पाम सिव्हेट’ (कस्तुरी मांजर, उदबिलाव कुळातील वन्य प्राणी) या वन्यजीवाचा मृतदेह जप्त केला. हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित प्रजातींमध्ये मोडतो.

तसेच आणखी एका वन्य प्राण्याचे मांसही जप्त केले असून ते घोरपड अथवा ‘माऊस डिअर’ यापैकी कोणत्या प्राण्याचे आहे, याची खातरजमा करण्यासाठी नमुने न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

या प्रकरणात शिकारीसाठी वापरलेली बंदूकही जप्त करण्यात आली आहे.

बेपत्ता संशयितांपैकी दोघे खासगी सुरक्षा संस्थांशी संबंधित असल्याचे, तर आणखी एकजण सरकारी कर्मचारी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

गोव्यातील काही घटकांकडून प्रकरण कमकुवत करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच गोवा-कर्नाटक सीमावर्ती भागात कार्यरत असलेल्या संभाव्य शिकारी जाळ्याचा या घटनेत सहभाग असू शकतो, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

गोवा सीमेपासून जवळ असलेल्या बोंडेली गावात सुमारे ६० कुटुंबे वास्तव्यास आहेत.

सीमावर्ती भागातील सततच्या ये-जा आणि जंगल परिसराशी असलेला संपर्क यांमुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर शिकारीला खतपाणी मिळत असल्याचे वन्यजीव कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

वन खात्याने फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिकारप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

SCROLL FOR NEXT