Kadamba Bus Stand Dainik Gomantak
गोवा

फोंड्यातील कदंब बसस्थानक 'बंद'

धोकादायक फलक लावले: पावसाळ्यात होणार गैरसोय, तात्पुरती शेड उभारण्याची गरज

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा बसस्थानक धोकादायक असल्याचा फलक लावण्यात आल्याने आता ऐन पावसाळ्यात प्रवाशांनी बससाठी थांबायचे कुठे? असा सवाल निर्माण झाला आहे. या कदंब बसस्थानकाच्या चारही बाजूंनी पत्रे उभारून आतमध्ये जाण्यास प्रवाशांना अटकाव करण्यात आला आहे. नूतनीकरणासाठी हे बसस्थानक बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत असले तरी ऐन पावसाळ्यात आता प्रवाशांची सोय कुठे, या प्रश्‍नाला सध्या उत्तरच नाही. विशेष म्हणजे ‘गोवा कॅन'' या संस्थेनेही या विषयावर बोट ठेऊन वाहतूक खात्याला तसेच कदंब महामंडळाला यासंबंधी विचारणा केली आहे.

सध्या या बसस्थानकावरून वाहतूक सुरू होत असली तरी लोकांना उन्हात ताटकाळत थांबावे लागते, त्यातच बसस्थानकावरील चहा, थंडपेयाचे स्टॉल्सही बंद करण्यात आल्याने अधिकच गैरसोय झाली आहे.

आता सबंध बसस्थानकच धोकादायक बनल्याने दुरुस्तीकाम हाती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यासाठी धोकादायक फलकही उभारण्यात आले असून लोखंडी पत्र्याचे अडथळे बसस्थानकाच्या शेजारी उभे करून प्रवाशांना धोक्याची कल्पना देण्यात आली आहे, मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे हे दुरुस्तीकाम कधी सुरू होणार, कधी पूर्ण होणार याबाबत कुणीच काही सांगू शकत नाही.

1991 झाली होती पायाभरणी: फोंड्यातील कदंब बससस्थानकाची पायाभरणी तत्कालीन मुख्यमंत्री तसेच विद्यमान फोंड्याचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांनी 1991 साली केली होती. वर्षभराच्या कालावधीनंतर 1992 मध्ये या बसस्थानकाचे उद्घाटनही झाले, मात्र गेली तीस वर्षे या बसस्थानकाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. फक्त जुजबी काम तेवढे केले जाते, मात्र मुख्य दुरुस्ती करण्यात आली नसल्याने दोनवेळा या बसस्थानकाच्या छताचा सिमेंट काँक्रिटचा तुकडा खाली पडला होता. यात प्रवाशी जखमी झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT