स्‍पिरिट ऑफ गोवा महोत्‍सवाचे उद्‌घाटन

नियोजनाचा अभाव: लोकांची पाठ
Spirit Of Goa
Spirit Of GoaDainik Gomantak

पणजी: कोरोना आटोक्‍यात आल्‍याने राज्‍यातील पर्यटन सुरू केले असून, देशी पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. राज्‍यातील पर्यटन उद्योजक, टुरिस्ट ॲण्ड टुरिझम ऑफ गोवा आदींच्‍या सहकार्याने यापुढेही विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. राज्‍यातील पर्यटनवाढीसाठी असे उपक्रम आयोजित करणे आवश्‍यक असते. त्यामुळेच गोव्‍याची संस्‍कृती, इतिहास लोकांपर्यंत पोचतो, असे वक्‍तव्‍य पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.

पर्यटन खात्‍याच्या ‍वतीने आयोजित स्‍पिरीट ऑफ गोवा या तीन दिवस चालणाऱ्या महोत्‍सवाचे आज शुक्रवारी रात्री 9 वाजता उद्‌घाटन झाले. यावेळी पर्यटनमंत्र्यांसह पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा सावर्डेचे आमदार गणेश गावकर, पर्यटन सचिव रवी धवन, महामंडळाचे कार्यकारी संचालक निखिल देसाई, पर्यटन सचिव मिनिनो डिसोझा आदी उपस्‍थित होते.

Spirit Of Goa
चिखलीतील 44 बांधकामे अडचणीत

रोहन खंवटे आणि आमदार गावकर यांच्‍या हस्‍ते महोत्‍सवाचे उद्‌घाटन झाले. यावेळी आतषबाजी करण्यात आली. येथे उभारलेल्‍या मंचावर गोमंतकीय लोकनृत्‍याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी कोकणी कातार गायिका लोर्ना यांचाही कार्यक्रम झाला.

बाबूश मोन्सेरात अनुपस्थित: या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत असल्‍याने येऊ शकले नाहीत. महोत्‍सवाच्‍या निमंत्रण पत्रिकेवर आमदार तथा मंत्री बाबूश मोन्‍सेरात आणि पणजीचे महापौर रोहित मोन्‍सेरात यांचीही नावे होती. त्‍यांनीही येथे उपस्‍थिती लावली नाही. मुख्यमंत्री दिल्लीत होते; पण मोन्‍सेरात पिता-पुत्र का आले नाहीत, हे समजू शकले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com