फोंड्यात पडझड सुरूच...

अवकाळी पावसाने राज्याला झोडपून काढले
वादळी वाऱ्यामुळे केळी अशा जमीनदोस्त झाल्या.
वादळी वाऱ्यामुळे केळी अशा जमीनदोस्त झाल्या.Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: अवकाळी पावसाने राज्याला झोडपून काढले असून, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने पडझड सुरूच आहे. फोंडा तालुक्यात झाडे जमीनदोस्त होण्याबरोबरच वीज खांबही मोडून पडत आहेत. काल (गुरुवारी) सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शिरोडा, तळावली तसेच अन्य काही भागांत झाडे कोसळली. त्यामुळे दोन घरांचे नुकसान झाले.सायंकाळी अचानकपणे वादळी वारा आणि विजा चमकून पाऊस सुरू झाला. या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे लोकांची धांदल उडाली.

वादळी वाऱ्यामुळे केळी अशा जमीनदोस्त झाल्या.
स्‍पिरिट ऑफ गोवा महोत्‍सवाचे उद्‌घाटन

कामावरून घरी परतणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागले. शिरोडा भागात आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या मागे असलेल्या एका घरावर झाड कोसळले. तसेच तळावली भागात मंदिराच्या मागे असलेल्या घरावर झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले. काल सायंकाळी अग्निशामक दलाला नऊ कॉल आले. मात्र सर्वाधिक हानी वाळपई भागात झाली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीज खांब उन्मळून पडले; तर वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी आंबा, फणस, केळी, पोफळीची झाडे जमीनदोस्त झाली. उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Daksh Polji HSSC Success
Goa Crime
Goa Drug Case
Goa Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com