Kadamba Transport
Kadamba Transport  Dainik Gomantak
गोवा

Kadamba: पणजी, मडगावला जायचंय? वाट पहावी लागेल... कदंबकडे बसची कमतरता, बस स्थानकावर रांगच रांग

Pramod Yadav

Kadamba Transport: गोव्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. कदंबाकडे बसची कमतरता हा चगळून चोथा झालेला विषय आहे. मात्र, प्रवाशांच्या समस्या काही संपण्याचे नाव घेत नाहीत. पणजी ते मडगाव आणि मडगाव ते पणजी (Panaji To Margao) प्रवास करणाऱ्या प्रवशांसाठी कदंबाच्या बस स्थानकावर बससाठी रांगेत उभे राहणे अपरिहार्य होत आहे. कदंब मंडळाकडे बसची कमतरता असल्याने सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दररोज सकाळी कामासाठी जाणारे कर्मचारी, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच, इतर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. सायंकाळी देखील घरी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. पण बसची कमतरता असल्याने दररोज प्रवाशांना एक ते दीड तास बससाठी रांगेत थांबून वाट पहावी लागत आहे.

कदंबाने पन्नास इलेक्ट्रिक बस नव्याने सेवेत रूजू केल्या आहेत. त्या आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि उरलेल्या कर्माचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांसाठी धावतात. त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी मडगाव आणि पणजी बस स्थानकावर बससाठी रांगेत थांबावे लागते.

पास धारक, मार्केटपर्यंत जाणारी शटल सेवा आणि नियमित प्रवासी अशा तीन रांगा बसस्थानकावर असतात. जादा बसेस सोडण्यासाठी बस स्थानकावर वाद घालावा लागतो असे प्रवासी सांगतात.

दरम्यान, दरवर्षी 10-12 टक्के प्रवाशांची वाढ होते. दररोज किमान 40 हजार पास वितरीत केले जातात. असे कदंबाच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रवाशांची समस्या सोडवण्यासाठी आणखी 200 बसेसची आवश्यकता असल्याचे देखील कदंबाच्या वतीने सांगितले जात आहे.

तसेच, प्रवाशांनी कदंब बसेसची संख्या वाढविण्याची गरज असून, प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली आहे. तसेच, बसस्थानकावर देखील स्वतंत्र काउंटर निर्माण करावेत जेणेकरून प्रत्येकाला त्याची तिकीटाची चौकशी करता यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Goa Today's Live News Update: ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मोन्सेरात पॅनल विजयी

Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

Highest FD Interest Rates: FD धारकांसाठी आनंदाची बातमी, PPF-सुकन्या समृद्धी पेक्षा 'या' बँका देतायेत जास्त व्याजदर

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

SCROLL FOR NEXT