Jyoti Malhotra religion row Dainik Gomantak
गोवा

Jyoti Malhotra: ज्योतीने धर्म बदलल्याच्या चर्चा; युट्युबर मल्होत्राच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ

Jyoti Malhotra Police Custody: ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून तिच्या कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे

Akshata Chhatre

Jyoti Malhotra news: हरियाणास्थित यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून आता तिच्या कोठडीमध्ये आणखीन चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ज्योती सोबत यावेळी इतर सहा जणांनाही अटक करण्यात आली आहे. ज्योतीच्या अटकेबरोबरच सध्या ज्योतीने धर्म बदलला असल्याच्या देखील चर्चांना उधाण आलं आहे.

ज्योतीने धर्म का बदलला?

सध्या सोशल मीडियावर ज्योतीच्या बाबतीत अनेक चर्चा सुरु आहेत, यांपैकीच एक म्हणजे दानिश यांच्या संपर्कात आल्यानंतर ज्योतीने धर्म बदलला असल्याच्या चर्चा सुरु आहेत, मात्र हिसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व चर्चा वरवरच्या असून त्यात काहीही तथ्य नाही.

ज्योतीला धर्म बदलण्यात दानिशच्या पत्नीने देखील तिला मदत केली असल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका असं पोलीस म्हणाले आहेत. सोशल मीडियावर सुरु असलेल्या सर्व बातम्या पोलिसांनी फेटाळून लावल्या आहेत.

'ट्रॅव्हल विथ ज्यो नावाचे यूट्यूब चॅनल चालवणारी ज्योती मल्होत्रा हिने २०२३ मध्ये कमिशन एजंटमार्फत व्हिसा मिळवून पाकिस्तानला भेट दिली होती. या भेटीदरम्यान तिने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशी जवळीक साधली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिश हा इस्लामाबादच्या कुख्यात इंटर-सर्विसेस इंटेलिजन्सचा एजंट होता.

दानिशचा पासपोर्ट इस्लामाबादमधून जारी

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताने या महिन्याच्या सुरुवातीला त्याला भारतातून बाहेर काढले होते. दानिशचा पासपोर्ट इस्लामाबादमधून जारी करण्यात आला होता आणि त्याला २१ जानेवारी २०२२ रोजी भारतासाठी व्हिसा मिळाला होता. त्याचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल येथे झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT