Jyoti Malhotra  Whatsapp Chats
Jyoti MalhotraDainik Gomantak

Jyoti Malhotra: 'माझं लग्न पाकिस्तानात लावून द्या...' PAK अधिकाऱ्यासोबत ज्योती मल्होत्राचं व्हॉट्सॲप चॅट; पोलिसांसमोर काय दिली कबुली?

Jyoti Malhotra Whatsapp Chats: भारताशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्रासंबंधी रोज नव-नवे खुलासे होत आहेत. यातच आता, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित हसन अली आणि ज्योतीचे एक व्हॉट्सॲप मेसेज समोर आला आहे.
Published on

भारताशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्रासंबंधी रोज नव-नवे खुलासे होत आहेत. यातच आता, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित हसन अली आणि ज्योतीचे एक व्हॉट्सॲप मेसेज समोर आला आहे. यामध्ये ज्योती पाकिस्तानमध्ये हसन अलीशी लग्न करण्याबाबत बोलत असताना दिसत आहे. ज्योतीने या व्हॉट्सॲप चॅटवर अद्याप कोणताही नवा खुलासा केलेला नाही. जर तिने पाकिस्तानी युट्यूबर किंवा कोणत्याही लोकप्रिय व्यक्तीशी लग्न केले तर सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स वाढतील. यामुळे तिच्या पोस्टला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळतील, असा तिचा समज होता.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिशप्रमाणेच हसन अली हा देखील पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा अधिकारी आहे. दानिशच्या माध्यमातून ज्योती हसन अलीच्या संपर्कात आली. तिच्या पाकिस्तान (Pakistan) भेटीदरम्यान हसन अली यानेच तिच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यापासून ते प्रवासापर्यंत व्हीआयपी सुविधांची व्यवस्था केली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानहून परतल्यानंतरही ज्योती ​​हसन अलीच्या सतत संपर्कात होती. तिने सांगितले की, पाकिस्तानमधील वास्तव्यादरम्यान हसन अलीने तिची ओळख शाकीर आणि राणा शाहबाजशी करुन दिली होती.

Jyoti Malhotra  Whatsapp Chats
Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्राने पाकिस्तानात घेतले होते ट्रेनिंग, लष्कर-ए-तोयबाच्या ठिकाणी केला 14 दिवस मुक्काम; तपासात खुलासा

व्हॉट्सॲप चॅट

हसन अलीने व्हॉट्सॲपवर लिहिले होते, "मी मनापासून प्रार्थना करतो की तू नेहमी आनंदी राहा. तू नेहमी असच हसत आणि खेळत राहा, तुझ्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये." याला उत्तर म्हणून, ज्योती मल्होत्राने पहिल्यांदा हसणारा इमोजी पाठवला; यानंतर तिने लिहिले, "मग माझे लग्न पाकिस्तानात करा." जरी या गप्पा विनोदी वाटत असल्या तरी पोलीस त्यातून अनेक अर्थ काढत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, ज्योती पाकिस्तानात राहण्याचा विचार करत आहे.

ज्योतीने 'या' गोष्टी कबूल केल्या

ज्योती पाकिस्तानमधील अनेक लोकांशी सोशल मीडियावर चॅट करत असल्याची माहिती मिळाली असून तिने स्वतः कबूल केले आहे की ती पाकिस्तानात राहणाऱ्या लोकांशी व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर चॅट करायची. या काळात तिने अनेक संवेदनशील माहितीची देवाणघेवाणही केली. तिने सांगितले की, ती दिल्लीतील (Delhi) पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशला भेटायलाही अनेक वेळा गेली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीच्या गप्पा आणि कबुलीजबाबावरुन हे स्पष्ट होते की तिचे पाकिस्तानशी जिव्हाळ्याशी संबंध निर्माण झाले होते.

Jyoti Malhotra  Whatsapp Chats
Jyoti Malhotra: ज्योतीने स्वतःच दिला हेरगिराचा पुरावा; 'ट्रॅव्हल विथ ज्यो'मधून पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबतचं गुपित उघड

पोलिस बँक खात्यांच्या चौकशीत व्यस्त

पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात ज्योती मल्होत्राच्या चार बँक खात्यांबद्दल माहिती मिळाली आहे. या खात्यांमधून होणारे व्यवहार दुबईमध्ये आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत, तपास यंत्रणा हे व्यवहार कोणासोबत केले गेले आणि त्यांचा उद्देश काय होता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, ज्योतीने पोलिसांसमोर कबूल केलेआहे की, ती पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com