Mandrem Car Accident Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: फर्नांडिस कुटुंबाला न्याय द्या! कार दुर्घटनेतील मृत्यूमुळे परिवारावर आर्थिक संकट; तपासात ढिलाई होत असल्याचा दावा

Mandrem Accident Case: संशयित स्वत:हून पोलिस स्थानकात हजर झाला होता. यावेळी ग्रामस्थांनीही पोलिस स्थानकावर धाव घेत संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Sameer Panditrao

मोरजी: जूनसवाडा, मांद्रे येथील मेरी ऊर्फ मारिया फर्नांडिस (७०) या महिलेला वाहनाची धडक देऊन ठार केल्या प्रकरणी संशयित दीपन राजू बत्रा (२१) याला मांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी फर्नांडिस कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

ग्रामस्थांची एक विशेष बैठक जुनसवाडा देसाईनगर येथे झाली. यावेळी सरपंच राजेश मांद्रेकर, पंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक, ॲड. प्रसाद शहापूरकर, पंच चेतना पेडणेकर, संपदा आसगावकर, किरण सावंत, रॉबर्ट फर्नांडिस, तसेच मेरी फर्नांडिस यांची मुले जोजफ आणि डेजमन फर्नांडिस उपस्थित होते.

फर्नांडिस कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोवर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. मेरी यांचे दोन मुलगे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून होते. दोघेही बेरोजगार असून स्थितीही हलाखीची आहे. तसेच घरही मोडकळीस आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निधीतून घर दुरुस्त करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मेरी या शहाळी विकून उदरनिर्वाह करायच्या. संशयित दीपन बत्रा याच्या वाहनाची ठोकर बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे, त्यामुळे संशयितावर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे. पोलिस यंत्रणेने या प्रकरणाचा कसून तपास करावा. सीसीटीव्हीत सर्व कैद झाले आहे, तो महत्वाचा पुरावा आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

कायदा सुव्यवस्था बिघडली; शहापूरकर

यावेळी प्रसाद शहापुरकर यांनी पोलिस संययिताला व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचा दावा केला. तसेच पेडणे तालुक्यातील कायदा सुविधा बिघडली असून बिगर गोमंतकीय, पर्यटक व स्थानिकांमधील संघर्ष वाढल्याचा दावा केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सरकारने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

पोलिसांनी कसून तपास करावा ; सरपंच

सरपंच राजेश मांद्रेकर यांनी पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करून संशयिताला कठोर शिक्षा होईल, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

तपासात ढिलाई, लोकांत नाराजी

जुनसवाडा, मांद्रे येथील मेरी फर्नांडिस या महिलेला वाहनाने धडक दिल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली असली तरी या प्रकरणाच्या तपासाबाबत लोक संशय व्यक्त करीत आहेत.

मेरी यांना धडक दिल्यानंतर संशयित स्वत:हून पोलिस स्थानकात हजर झाला होता. यावेळी ग्रामस्थांनीही पोलिस स्थानकावर धाव घेत संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा पंचनामा आणि दोन पंचांच्या उपस्थितीत केला, मात्र फॉरेन्सिक पथक तब्बल १४ तासांनी घटनास्थळी पोहोचले. तसेच संशयिताला पोलिस कोठडीत घेण्याबाबतही पोलिसांनी उत्साह दाखवला नाही, त्यामुळे लोक तपासाबाबत संशय व्यक्त करून येथील पोलिस निरिक्षकांच्या बदलीची मागणी करू लागले आहेत.

कार्यक्षम निरीक्षक नेमावा

याबाबत सुकाजी नाईक यांनी या तपासाबाबत संशय व्यक्त करीत पोलिस संशयिताला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा केला. तसेच पोलिस निरिक्षकाच्या फेरनियुक्तीबाबतही संशय व्यक्त केला.

ग्रामस्थ सुदेश सावंत यांनी सांगितले की, मांद्रे पोलिस संशयिताला संरक्षण देत असून तपासात ढिलाई केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

माजी सरपंच प्रशांत नाईक यांनी सांगितले की, पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. याचा अर्थ मांद्रे पोलिसांचा कोणताही वचन नाही हे दिसून येते. या ठिकाणी कार्यक्षम निरीक्षक नेमावा अशी मागणी त्यांनी केली.

फर्नांडिस कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत; आरोलकर

आमदार जीत आरोलकर यांनी बुधवारी मयत मारिया फर्नांडिस यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व सरकारतर्फे सर्व मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी मांद्रेचे माजी सरपंच रोजा ऊर्फ मींगेल फर्नांडिस, स्थानिक पंच सदस्य रॉबर्ट फर्नांडिस आदी उपस्थित होते. आरोलकर यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी बाहेर असल्यामुळे आपण पोचू शकलो नाही. मांद्रेत पोहोचल्यानंतर लगेच आपण फर्नांडिस कुटुंबीयांच्या भेटीसाठी आला. तिच्या दोन्ही मुलांची भेट घेऊन त्यांना आवश्‍यक मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

SCROLL FOR NEXT