ED Raid Dainik Gomantak
गोवा

ED Raid: गोव्यात 'ईडी'ची मोठी कारवाई! पैशांच्या अफरातफर प्रकरणी 2.29 कोटींची मालमत्ता जप्त

ED Raid Goa: गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारे ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने हा तपास सुरू केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ‘जिवा मान्स अँड मिनरल्स लिमिटेड’ आणि इतरांविरुद्ध पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद असून याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पीएमएलए, २००२ अंतर्गत २.२९ कोटी रुपये किमतीच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यामध्ये दोन जमिनी आणि एका फ्लॅटचा समावेश असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारे ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने हा तपास सुरू केला होता. आरोपींविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याबाबत आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे.

तपासादरम्यान गुन्ह्यातील पैशांतून खरेदी करण्यात आलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील गालेल गावातील जमिनीचे दोन भूखंड आणि अंधेरी (पश्चिम) येथील एक निवासी फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. ईडीच्या तपासानुसार, संशयितांनी २०१० मध्ये ‘मेसर्स लाओ टिंग दाडी मोबाईल कंपोनंट्स कंपनी लिमिटेड’ या परदेशी कंपनीची सुमारे १३.४२ कोटी रुपयांची (२.९५ दशलक्ष यूएस डॉलर्स) फसवणूक केली होती.

या निधीचा वापर करूनच वरील मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. संशयितांनी जमिनीची मालकी आणि खाणकामाच्या हक्कांबद्दल खोटी आश्वासने आणि चुकीची माहिती देऊन परदेशी कंपनीला ‘जिवा माइन्स अँड मिनरल्स लिमिटेड’ सोबत लोहखनिज उत्खनन आणि निर्यातीसाठी संयुक्त उपक्रम करण्यास प्रवृत्त केले होते.

खाणकाम आणि निर्यातीसाठी मोठा निधी प्राप्त होऊनही संशयितांनी कोणतेही उत्खनन किंवा निर्यातीचे काम केले नाही. त्याऐवजी, हा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वळवण्यात आला आणि त्यातून मालमत्ता खरेदी करण्यात आल्या. बँकेच्या व्यवहारांच्या सखोल विश्लेषणातून हा निधी कशाप्रकारे वळवण्यात आला आणि त्याचा वापर कसा झाला, हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT