ED Raid Anjuna: गोव्यात ईडीची मोठी कारवाई! 2.83 कोटींच्या सापडल्या नोटा; बँक खाती गोठवण्याचे आदेश

ED Raid Goa: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हणजूण येथील एका संशयिताच्या निवासस्थानावर छापा टाकून तब्बल २ कोटी ८३ लाख ७० हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे.
ED Raid
ED RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हणजूण येथील एका संशयिताच्या निवासस्थानावर छापा टाकून तब्बल २ कोटी ८३ लाख ७० हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई केली असून संशयिताची बँक खातीही गोठविली आहेत. घराच्या झडतीदरम्यान ‘ईडी’ला २,८३,७०,००० रुपयांची रोकड सापडली. यामध्ये प्रामुख्याने ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘ईडी’च्या पणजी विभागीय कार्यालयाने १६ जानेवारी रोजी हणजूण येथील ओमकार केशव पालयेकर यांच्या घरावर छापा टाकला. ही कारवाई पीएमएलए कलम १७ अंतर्गत मिळालेल्या अधिकृत परवानगीनुसार करण्यात आली. या शोध मोहिमेचे नेतृत्व साहाय्यक संचालक प्रवीण कुमार अग्रवाल यांनी केले.

तपासासाठी महत्त्वाचा ठरू शकणारा एक मोबाईल जप्त केला आहे. तसेच ओमकार पालयेकर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली बँक खाती ‘गुन्ह्यातील कमाई’ असल्याच्या संशयावरून तातडीने गोठवण्याचे आदेश देखील दिले आहेत.

ED Raid
अंमली पदार्थांच्या काळ्या पैशावर ED आणि NCB ची सर्जिकल स्ट्राईक! गोव्यासह 7 राज्यांतील 25 ठिकाणी छापेमारी; कोट्यवधींची रोकड जप्त

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेली रोकड आणि संपत्ती ही बेकायदेशीर मार्गाने मिळविल्याची दाट शक्यता आहे. ही कारवाई अत्यंत व्यावसायिक पद्धतीने आणि धार्मिक भावनांना धक्का न लावता पार पाडण्यात आली. रात्री उशिरा पंचनामा पूर्ण झाला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

ED Raid
ED Raid Kolkata: कोळसा घोटाळ्याचं 'गोवा कनेक्शन'! I-PAC वरील धाडीनं ममता बॅनर्जींचा हाय-व्होल्टेज ड्रामा; कोलकात्यात तणावाचं वातावरण

कुलूप तोडले; घरमालक बेपत्ता

१. ही शोध मोहीम शुक्रवारी सकाळी ७.५० वाजता सुरू झाली होती. सुमारे ८०० चौरस मीटरच्या या आलिशान घरात पालयेकर यांचे संयुक्त कुटुंब राहते. मुख्य संशयित ओमकार पालयेकर हा कारवाईवेळी घरात नव्हता.

2.या कारवाईत सापडलेल्या रोख रकमेवर कुटुंबातील सदस्यांनी मालकी हक्क सांगितला; परंतु त्या रकमेचा कोणताही अधिकृत स्रोत किंवा कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com