Jeet Arolkar Dainik Gomantak
गोवा

"भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी.."; जीत आरोलकरांच्या दातृत्वामुळे 4 वर्षाच्या मुलाला नवजीवन; गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

Jeet Arolkar: आमदार जीत आरोलकर यांनी पुन्हा एकदा दातृत्वाची प्रचीती दिली आहे. चावदेवाडा-पार्से येथील आरव नागवेकर या चार वर्षे वयाच्या मुलाला हृदयाचा गंभीर आजार होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: कासारवर्णे येथील उमेश वरक या युवकाच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाचे योगदान देऊन त्याला जीवनदान दिल्यानंतर मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी पार्से येथील चार वर्षांच्या मुलाच्या गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत केल्याने त्याला नवजीवन लाभले.

आमदार जीत आरोलकर यांनी पुन्हा एकदा दातृत्वाची प्रचीती दिली आहे. चावदेवाडा-पार्से येथील आरव नागवेकर या चार वर्षे वयाच्या मुलाला हृदयाचा गंभीर आजार होता. त्याचे हृदय उजव्या बाजूला होते आणि हृदयाला छिद्र पडले होते.

गोव्यात त्याच्यावर उपचार होऊ शकत नसल्याने आई-वडिलांनी आरवला बेळगावातील एका खासगी इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा उपाय सुचवला होता. सरकारी वैद्यकीय योजनेतून आरववर एक शस्त्रक्रिया झाली होती.

आरववर आणखी एक शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. पण सरकारी योजनेच्या उपलब्ध निधीमध्ये दुसरी शस्त्रक्रिया होऊ शकत नव्हती. शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च हा आई-वडिलांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने ते हतबल झाले होते.

आरवच्या आई-वडिलांनी आमदार आरोलकर यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आरोलकर यांनी त्यांना धीर दिला, तसेच शस्त्रक्रियेसाठी येणारा सर्व खर्च करण्याचे आश्वासनही दिले. शनिवारी (ता.२८) आरववर दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो शुद्धीवरही आला. आमदार आरोलकर यांनी शनिवारी सकाळी बेळगाव येथे इस्पितळात जाऊन आरवची भेट घेतली. तसेच डॉक्टरांशीही चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT