Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : उपराष्ट्रपतींनी केली शेतकऱ्याची आदराने विचारपूस

Panaji News : यावेळी केळकरांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड गुरुवारी दुपारी २ वाजता राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई लिखित २०० व्या वामन वृक्ष कला या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दरबार हॉलमध्ये उपस्थित नागरिकांना अभिवादन करत व्यासपीठाच्या दिशेने ते जात असताना त्यांची नजर धोती, कुडता, शाल आणि बंडी या पारंपरिक वेशात उभे राहून अभिवादन करणाऱ्या ९४ वर्षीय विश्वनाथ केळकर यांच्यावर पडली.

त्यावेळी धनखड यांनी त्यांची आपुलकीने चौकशी केली. यावेळी केळकरांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत केले. आपण एक शेतकरी असून मी राज्यपालांच्या निमंत्रणावरून आल्याचे त्यांनी सांगितले. राजभवनात मी पहिल्यांदा आलो असून येथील थाटमाट, आदर सन्मान पाहून मी भारावलो, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाला आकस्मिक भेट

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला जात असताना उपराष्ट्रपतींनी आपला ताफा थांबवत राज्यातील एकमेव विद्यापीठ असलेल्या गोवा विद्यापीठात आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठातील कामकाजाची माहिती जाणून घेतली.

भेटीदरम्यान कुलगुरु प्रो. हरिलाल मेनन, कुलसचिव प्रा. व्ही. एस. नाडकर्णी व इतर प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपतींनी विद्यापीठाला काही सूचना केल्या, त्यावर त्या अमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे विद्यापीठ प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; दामूंच्‍या मनात चाललंय काय?

Aggressive Dogs Ban: क्रूर कुत्र्यांच्‍या मालकांची आता मुळीच गय नाही! राज्‍यपालांच्‍या मंजुरीनंतर 2 विधेयकांचे झाले कायद्यात रुपांतर

भारत-पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; अंतिम सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

'दशावतार'ला गोमंतकीयांची पसंती! CM सावंतांनीही घेतला सिनेमाचा आनंद, म्हणाले,"गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत..."

SCROLL FOR NEXT