Goa Government: शासकीय कामात रोख व्यवहार होणार बंद

Goa Government: मुख्यमंत्री : ‘कौटिल्य’ लेखा भवनचे लोकार्पण
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak

Goa Government: डिजिटल क्रांतीचा भाग म्हणून सर्व सरकारी कामातून रोख पैशांचा वापर बंद करण्यात येत असून सर्व व्यवहार यूपीआय - डिजिटलमार्फत करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Goa Government
Land Grabbing Case: 12 कोटींची मालमत्ता जप्त

पर्वरी येथे नव्याने उभारलेल्या ‘कौटिल्य’ लेखा भवनचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल, विशेष सचिव डॉ. कांदवेल्लू, कविता नाईक, संदीप साळगावकर, हरिश अडकोणकर, लेखा संचालक दिलीप उम्रसकर उपस्थित होते.

पणजीतील जुनी लेखा विभागाची इमारत (फाजेंद बिल्डिंग) अपुरी पडत असल्याने आणि तिच्या दुरुस्तीच्या बाबतीत अनेक

अडचणी येत असल्याने जीआयडीसीने पर्वरीतील शिक्षण खात्याच्या शेजारी ही नवी बहुमजली इमारत उभी केली असून ‘कौटिल्य’ लेखा भवन असे या कार्यालयाचे नामकरण केले आहे.

दोन तासांत पैसे जमा

केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून येणारे पैसे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये केवळ दोन तासांमध्ये जमा होतील, अशी नवी व्यवस्था लेखा कार्यालयाने केली आहे.

या व्यवस्थेचा शुभारंभ ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यापूर्वी केंद्र सरकारच्या विविध योजनांचे पैसे तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. यात शेतकऱ्यांचाही समावेश आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com