Goa Minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

'ही वेळ बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्याची', गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे स्वातंत्र्यदिनी वक्तव्य

Goa Minister independence speech: गोवा १९ डिसेंबर २०२४ पर्यंत १०० टक्के साक्षर होईल, असा दावा मुख्यमंत्री सावंत यावेळी केला.

Pramod Yadav

फोंडा: भारताचा शेजारी बांगलादेशात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे तेथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सर्व स्तरातून आवाज उठवला जात आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांनी बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्याची ही वेळ असल्याचे म्हटले आहे.

कृषिमंत्री रवी नाईक भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणात बोलत होते. रवी नाईक यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या.

'सर्वधर्मियांना सामावून घेणाऱ्या आपल्या भारत देशाचा आपल्याला अभिमान असायला हवा. देशाला बळकट ठेवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता फार महत्वाची आहे. आता बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्याची वेळ आहे', असे मंत्री रवी नाईक यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील स्वांतत्र्यदिनाच्या निमित्ताने गोमंतकीयांना संबोधित केले. राज्य १९ डिसेंबर २०२४ पर्यंत १०० टक्के साक्षर होईल, असा दावा मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या भाषणात राज्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईनची देखील घोषणा केली. या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या समस्या आणि तक्रारी करता येणार आहेत.

राज्यातील खाजन शेतीच्या रक्षणासाठी राज्य सरकार गोवा खाजन शेती बोर्डाची स्थापना करणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केली.

राज्यातील सर्व 12 तालुक्यातील प्रशासकीय इमारती सुसज्ज करण्यासह गरज आहे तिथे नव्या इमारतींची पायाभरणी करण्याचे आश्वासन यावेळी सावंत यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Language: मराठी राजभाषा आंदोलनाची ताकद वाढवणार! 40 संमेलनाचे आयोजन; मराठी युवकांचा सहभाग

Sadolxem: सादोळशे परिसरात अनोळखी युवकांचा वावर! ग्रामस्थांत चिंता; पोलिस व मामलेदारांकडे कारवाई करण्याची मागणी

Iker Guarrotxena: 'गोव्याला माझे घर मानतो'! स्पॅनिश ग्वॉर्रोचेनाचे प्रतिपादन; मोसमअखेरपर्यंत FC Goa संघात

Baga Crime: सेंट क्रॉस कपेलाच्या मूर्तींची केली मोडतोड, नदीत दिल्या फेकून; मुंबईच्या एकाला अटक

Education Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार या 5 राशींचे लोक असतात 'पुस्तकी किडे'; अभ्यासात नेहमीच मिळवतात मोठे यश

SCROLL FOR NEXT