Goa Dainik Gomantak
गोवा

वाचनाने जीवन 'समृद्ध' होते!

दैनिक गोमन्तक

सासष्टी : वाचन हे जीवन समृद्धीसाठी महत्वाचे आहे. वाचनाची सुरवात स्वताच्या घरातुन व्हावी. घरात पुस्तके आली पाहिजेत. वाचन होत नसेल तर पुस्तकांचा उपयोग तो काय असे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेन्द्र आर्लेकर यानी प्रतिपादन केले. प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांच्या गौरव समारंभात बोलताना राज्यपाल आर्लेकर यानी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.

प्रा. अडसुळ हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असुन त्याचे साहित्य (Literature), लेखन, भाषा यावर चांगले प्रभुत्व असल्याचे त्यानी सांगितले. माणुस लीन असायला पाहिजे त्यामुळे तो चांगले जिवन जगू शकतो. प्रा. अडसूळ यांचा वारसा त्यांच्या विद्यार्थ्यांनी टिकवुन ठेवला पाहिजे. त्याचबरोबर सांस्कृतिक अनुबंध टिकवुन ठेवण्याची गरज असल्याचेही राज्यपाल आर्लेकर म्हणाले.

प्रा. अडसूळ यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे. त्यानी शिक्षकी पेशाला योग्य न्याय दिल्याचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सांगितले. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते समाजासाठी देण्याची भावना मनावर रुजविण्याचे काम प्रा. अडसूळ यानी केले असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची गरज आहे.त्यासाठी प्रा. अडसूळ यांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रा. अडसूळ यानी विद्यार्थ्यांना दिशा दाखवली असे रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक म्हणाले.

विनम्रता, विनयशिलता, बोलताना संवेदनशीलता, व आत्मचिंतन हे एखाद्या व्यक्तीमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र सद्या जग वाचन संस्कृतीपासुन दूर जात असल्याचे प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यानी सत्काविनम्रता, विनयशिलता, बोलताना संवेदनशीलता, व आत्मचिंतन हे एखाद्या व्यक्तीमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र सद्या जग वाचन संस्कृतीपासुन दूर जात असल्याचे प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यानी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

गोव्यात (Goa) आपला वेगवेगळे स्वातंत्र्यसैनिक व इतर महनीय व्यक्तींचा सहवास लाभला हे माझे भाग्य समजतो असेही प्रा. अडसूळ म्हणाले. माणसाने पणती सारखे जगाला प्रकाश देण्याचे काम करावे असे आवाहनही त्यानी या प्रसंगी केले. या कार्यक्रमात त्यांच्या कृष्णानुबंध व सृजनवेध या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. विनय कामत यानी मानपत्राचे वाचन केले तर प्रभाकर ढगे यानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सौ. मेघना कुरुंदवाडकर यानी आभार व्यक्त केले.

प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांना मानपत्र प्रदान करताना मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेन्द्र आर्लेकर, दामू नाईक, संध्या कामत व मान्यवर. दुसऱ्या फोटोत पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेन्द्र आर्लेकर, रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक, सदस्य सचीव संध्या कामत, सौ. मेघना कुरुंदवाडकर, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ व सौ अडसूळ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT